शिणला रे देह
शिणले रे मन
किती ही परीक्षा
देवराया //
रंजले गांजले
आयुष्य गंजले
कशासाठी घेतो
परीक्षा ही //
कोण तुझ्यावर
ठेवील विश्वास
छळशील जर
अतिरेकी //
तुझ्या नावाने मी
बोलतो कुणाशी
माझाच माझ्याशी
लपंडाव //
पुरे झाले आता
वृथा कष्टविणे
दे रे सारी सुखे
जीवनात //
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.