चार शब्द स्नेहाचे
उमटले माझ्या ओठी
शब्दचं झाली फुले
सखे फक्त्त तुझ्यासाठी ||
माझ्या जीवनातील तू
एक आश्वासक साथ
तुजमुळे लाभे मज
स्नेह सौख्याचा हात ||
तूझ्या स्वभावातील गोडवा
वाढवी स्नेह सौख्य आपुले
माझ्या आनंदाचे क्षण
आपल्या प्रेमभावाने झाले ||
निर्मळतेची जोड सखे
आपुल्या या स्नेहाला
हीच सदिच्छा तुजसाठी
उदंड आयुष्य लाभो तुजला ||
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.