भारतीय क्रिकेटची पायाभरणी 'विश्र्वचषक ८३'

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी क्रिकेटला पैसा आणि प्रसिद्धीचे जे वलय लाभलेले आहे ते भाग्य हाॅकीच्या वाट्यास आलेले नाही. आज भारतीय क्रिकेटला जे सोन्याचे दिवस आलेले आहेत किंबहुना कसोटी, एकदिवसीय सामने, टी ट्वेंटीत बऱ्या प्रमाणात भारतीय क्रिकेट संघ जी दादागिरी दाखवत आहे त्याची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने १९८३ च्या विश्वचषकात रोवली गेलेली होती. पिढी दरपिढी यात नवनवीन खेळाडूंनी आपले योगदान देत क्रिकेटचा वृक्ष आणखी बहारदार केलेला आहे‌. शिवाय बीसीसीआयच्या अख्त्यारीत क्रिकेटचे नियमन येताच भारतीय क्रिकेटविश्व गर्भश्रीमंतीत दाखल झालेले आहे. चला तर मग विरंगुळा म्हणून आपण १९८३ च्या विश्वचषकाचे एक अवलोकन करूया.

डॉ अनिल पावशेकरअनिल हे क्रिकेट ह्या विषयावर लेखन करतात. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel