काय गंमत आहे नाही ... नाही म्हणजे बघा ना ...

गलवान खोऱ्यात चकमक/ मारामारी झाली. एक मॅंडेरिन भाषा बोलणारे, एक धर्म ( बहुतेक ) असणारे चिनी जेव्हा हल्ला करत होते तेव्हा

१) भारताचे संरक्षण करणारी रेजिमेंट " बिहार " नावाने ओळखली जात होती
२) त्या रेजिमेंटचा कमांडिंग ऑफिसर (CO) एक तेलुगु भाषिक अधिकारी होता.
३) पहिला फटका झेलणारा सैनिक तमिळ होता.
४) प्रतिहल्ला करणारे सैनिक होते ते बंगाली, पंजाबी, हिंदी, भोजपुरी, मैथिली या भाषांबरोबरच भारतातल्या वेगवेगळ्या भाषा बोलीभाषा बोलणारे, वेगवेगळ्या जाती धर्माचे शूर सैनिक.
एका अक्षरश: एका सैनिकाने मनात विचारही आणला नसेल की, " मीच का? दुसरा कुणी का नाही?"
परवाच मला माहिती मिळाली की, जखमी सैनिकांना भेटायला एक माजी अधिकारी गेला तेव्हा त्याने एका सैनिकाला विचारले की, मुंड्या मुरगाळून, चेहरा ओळखू येणार नाही इतक्या निर्घृणपणे दगडांनी ठेचून तुम्ही चीनी सैनिकांना का ठार केलंत? त्या वेळी त्या सैनिकाचे उत्तर होते, " साब, उन लोगोंने हमारे सीओ (CO) साबको हाथ नही लगाने को मांगता था | बहोत गलत किया साब को हाथ लगाके |"
लक्षात येतंय का? एका तेलुगु बोलणाऱ्या अधिकाऱ्या बद्दल कुठलीतरी भलतीच भारतीय भाषा बोलणारा बिहार रेजिमेंटचा एक सामान्य सैनिक हे बोलत होता.
ही " आम्ही भारतीय " असल्याची भावना किती प्रखर असते हेच तर सैनिक आपल्या सर्वांना सांगत नाही ना?
आपण तो बंगाली,तो यूपी,तो बिहारी,तो गुजराथी, तो तामिळी वगैरे कधी पर्यंत करत बसणार, प्रत्येकाने "आम्ही भारतीय" हे मना मनात रुजवले पाहिजे. बरोबर ना....
तर सर्वांनी बोलूया....
🇮🇳"आम्ही भारतीय"🇮🇳
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel