शिर्षक-नात्यातील संदर्भ

वयाची मध्यंतरी गाठताना
आलेला पोक्तपणा ,
मनातील अल्लडपणा
विसरून जातो माणूस
जसे काय हिरव्या झाडाचे
हिरवे पान अलगद रंग
बदलून पिवळसर व्हावं तसं
पण, पिवळसर पानाचा
हिरवळ देटात दिसतच नाही
त्याने त्याचे टिकवून ठेवलेले अस्तित्व..
अगदी तसंच तुही
अचानक म्हणावस
मझ्या वागण्यावर हसत
प्रेमाने..

बाळा",वेडी आहेस तू अजून,
आणि हे ऐकताच
मी पुन्हा कित्येक वर्षे
क्षणात मागे जवून स्वतःला
माझ्यातली मी हरवलेली
ती अल्लड खोडकर
कितीही मोठं असलं तरी
बलिशपणाचे ते वागणे
सारं काही जाणूनही
लटक्या रागात खोडकर
त्रास देणे आणि वाढत्या
वयानुसार आवरून ठेवलेल्या
नत्यातल्ये काही संदर्भ
शोधू लागते नकळतपणे

तुझ्या एक प्रेमळ वाक्याने
मी नव्याने पुन्हा तरुण
होऊन जाते तुझ्याकडे पाहत
ओठांच्या पाकळ्या
खुलु लागतात
पुऱ्या आयुष्याची मरगळच
निघून जाते जणू

एवढं तारुण्य ,तेज,हास्य,
जर तुझ्या एक वाक्याने
बदलत असेल तर..
का आपण वयाच्या बंधनात
अडकून नात्यातले
प्रेमाचे संदर्भ बदलावे???

तू पुन्हा तशीच हाक दे
नव्याने नवीन बहर येईल
आपल्या नात्याला...

@सौ.अर्चना संतोष जाधव
सातारा
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel