💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*सामाजिक कविता*
*********************
*क्षण तो आनंदाचा*

वृद्धाश्रमात सेवा करतांना
आठवतो आजही तो क्षण
आत्मविश्वास गमावलेले एक वृद्ध
पाहत होते मला निरखुण

जवळ जावून मी म्हंटले बाबा
काय पाहता हो मजकडे
हे विचारताच पाणावुन
पाहू लागले ते चोहिकडे

धीर देऊन त्यांना मी
जेवण देऊ का विचारले
मानच फक्त हलविली त्यांनी
काहीच नाही उद्गारले

जेवण आणून मीच स्वतः
त्यांना घासही भरविले
आनंदाने इथेच रहा की
हसून त्यांना सांगितले

ईथे कोणाचा त्रास ना तुम्हाला
मनसोक्त आनंदी हसत रहावे
असे मी बोलताच हसले ते
अन् टपकन पडली माझीच आसवे

वेडी कुठली तूच का रडली
प्रयत्न करुन मलाच हसविण्याचा
कधीच विसरता येईल ना मला
आयुष्यातला क्षण तो आनंदाचा

उषा घोडेस्वार✍️✍️✍️
📚 *तक्षशील* 📚

💢💢💢💢💢💢💢💢💢💢
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel