🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 ॥ झाड आनंदाचं ॥

वाटेवर तुझ्या लाऊन ठेवलंय
एक झाड मी आनंदाचं
एकदा तरी वळून बघ ना
प्रेम लाभू दे आपुलकीचं !
गंधीत वारे वहात असता
दरवळ मजला तुझाच भासतो
रुंजी मनांत छेडत असता
दिड दा दिड दा झंकारतो !
चाल तुझी नखरेल अशी
ते दूरूनच पहात असतं
माझ्या मनांतल खूप काही
त्यालाच जणूं सांगायचं असतं !
तार छेडायची विसरून जाता
मनीचं गुंजन तव निनादतं
साथ तयाला देशील का ?
झाड आनंदाचं पुसत असतं ! ! !

©️.. सुनील चिटणीस
26 जून 2020
🌳🌳🌳🌳🌳🌳
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel