लॉक डाउन बंद करा
कोणाचीही तपासणी करु नका.
फिरू दे रस्त्यावर
खुप काम आहेत लोकाना
पण मग
उपचार मोफत ठेऊ नका
बैंक चे हफ्ते थांबवू नका
उपचार किमान रक्कम 1 लाख ठेवा.
खूप काम आहेत लोकाना
पंतप्रधान व मुख्यमंत्री साहेब
काय तुम्हांला हौस टिव्ही वर येऊन विनंती करण्याची
ह्यांना किंमत आहे का तुमच्या बोलण्याची
त्या टाटा-प्रेमजी ना पण सांगा
मदत थांबवा
तुमच्या भावी पिढीसाठी पैसा वाचवा
पोलिसा तू पण घरी जाऊन झोप काढ
थांबवू नको गर्दीला
आराम दे जरा लाठी- वर्दीला
अरे खूप काम आहेत लोकाना
ऑफ़िस पुन्हा सुरु झाल
की हेच दांड्या मारतील
वीकेंड च्या पिकनिकसाठी
नातेवाईक मारतील
मरू दे मेले तर
तुम्हाला काय करायच
कळत नाही का तुम्हाला
आम्हाला मॉर्निंग वॉकला फिरायचय
आमचे शौक मोठे
आम्ही घरी नाय बसणार
आम्ही भाजी, चिकन,मटन शिवाय जेवण नाय जाणार
आम्हाला डाळ भात नाय जाणार
बघ सरकार जमतय का हे करायला
खूप काम आहे लोकाना
Please अडवू नको त्याना फिरायला
😕😕😕
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel