by Sanjay kamble

नमस्कार मित्रांनो.. आशा करतो की तुम्ही सर्व बरेच असाल.. आता बरेच याचा अर्थ खूप, आधीक , जास्त किंवा पुष्कळ असं नाही. तर बरेच म्हणजे बरे असाला. शेवटी मराठी भाषा जशी वळवता येईल तशी वळते. आणि आपण सर्व मराठी. जाती, धर्माने वेगवेगळे असले तरी मराठी. आता आमच्यात जात आहे पण धर्म नाही. धर्म वगैरे संकल्पना तुमच्यात. आमच्यात फक्त जात, ती ही तुम्ही ठरवली म्हणून. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला जात आहे पण धर्म नाही, असा हा आहे तरी कोण..? याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच,

आज उन तसं जास्तच आहे. म्हणजे सकाळी मस्त थंडी पडते आणि दुपारी अस सहन न होण्यासारख उन. ते राक्षस अजूनही बाहेर आहेत . या छोट्याशा घराच्या लहानशा झरोक्यातून मी अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित त्यांना पाहू शकतो पण त्यापैकी कोणाचं लक्ष माझ्यावर नाही. आता मी अशा कोणत्या जागी आहे की मी त्यांना पाहू शकतो पण ते मला पाहू शकत नाहीत..? ते ही दिवस. आणि रखरखत उन्ह असताना.?

किती हे प्रश्न..?

आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

आता मी लपून बसलोय ती खरतर माझी जागा नाही,. आणि कोणाचे आहे हे मला माहिती नाही, आणि ते माहीत करून घेण्याची गरजही नाही. कारण त्या राक्षसांपासून आपला जीव वाचवण्यासाठी एका आसरा हवा होता आणि तात्पुरता का असेना तो मला मिळाला आहे. खरतर काल घडलेला तो प्रसंग माझ्यासाठी अनपेक्षित होता.

ते दैत्य. माझ्यावर झालेला प्राणघातक हल्ला, ती पळा पळ. बापरे. आठवलं तरी अजूनही काळजाचा थरकाप उडतो.

तर त्याचं झालं असं, कालही असंच रखरख उन पडल होत. सोबत मंद वारा ही सुटलेला. अशात मी निवांत एका झाडाखाली सावलीत बसून विश्रांती घेत होतो. एकंदरीत मन प्रसन्न करणारे वातावरण होतं. तोच मला काही अंतरावर झाडाखाली वाळलेल्या पानांची सळसळ जाणवली आणि मी सावध झालो. मान किंचित तिरकी करून पाहिल, पण कोणी दिसत नव्हता. म्हणून पुन्हा आपल्या जागी निवांत बसून राहिलो. तोच पुन्हा पानांची सळसळ. कोणीतरी आजूबाजूला आहे याची जाणीव मला झाली. आणि मी ही शोध घ्यायचे ठरवले. तडक उठलो. मान जरा उंच करत काही नजरेत येतय का हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो.

आणि मला, 'ती' दिसली. काही अंतरावर असलेल्या एका भल्या मोठ्या वृक्षाखाली उभी, 'ती'. थोडी अस्वस्थ, कावरीबावरी. वाट चुकलेल्या हरणी सारखी. जागेवरच उभी असली, तरी तिची संशयित नजर सर्वत्र फिरत होती. दिसायला सुंदर. अंगानं गुटगुटीत. शरीराची ठेवण अगदी जिथल्या तिथं . मी तिला पाहतच राहिलो आणि शरीराची भूक जागी झाली. आता ती कधी भूख आधीपासूनच होती. पण तिला पाहताच ती भुख चवताळून उठली. असं वाटत होतं की ते थेट तिच्यावर झडप घालावी‌ आणि.....

मी थोडासा कानोसा घेत पुढे सरकू लागलो पण माझ्या हालचालींमुळे वाळलेल्या पानांची सळसळ तीने ऐकली आणि सावध झाली. मागे पहाताच तिची नजर माझ्यावर पडताच ती आणखीनच घाबरली.

तीच अस घाबरून जाण स्वाभाविक होत. कारण त्या जागी आम्ही दोघेच होतो . आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. तिची नजर माझ्यावर खिळलेली आणि माझी नजर तिच्यावर. काही सेकंद सारं काही थांबल्या सारखा वाटला. कदाचित माझ्या नजरेतील चवताळलेली भूख तिला दिसली असावी आणि त्यामुळेच तिने घाबरून आपला चालण्याचा वेग वाढवला. मी ही तिला असं सहजासहजी सोडणार नव्हतो. मी ही तिच्या मागे चालू लागलो. मी पाठलाग करतोय हे समजताच मागे वळून न पाहता ती जिवाच्या आकांताने धावत सुटली. पण मला माहीत होतं तिथे हे सर्व प्रयत्न तोडके पडणार होते. धावता-धावता ती एका पडक्या घरात शिरली आणि तिथेच फसली. तिच्या मागे मगे मी ही त्या घरात शिरलो.

आता ती आयती माझ्या जाळ्यात सापडली होती. तोंडातून लाळ गाळत मी अधाशासारखा तिला पाहत होतो . ती मात्र बाहेर जाण्यासाठी केविलवाणी धडपड करत होती. मी तिच्यावर झडप घालणार तोच मला कोणतरी पकडला आणि त्या घरातुन बाहेर खेचू लागल. तसा मला भयंकर राग आला. 'तळपायाची आग मस्तकात जाण' म्हणतात ना अगदी तसंच. तिला तिथेच सोडून रागाच्या भरात मी बाहेर आलो आणि सुंन्न झालो. एक, दोन , तीन , .........सात, आठ...? अरे काय....? किती जण तिला वाचवयला आले होते. म्हणजे ही सगळी तीची 'चाल' होती तर. मला पकडून देण्याची. ज्याने मला पकडलं होतं मी नुसत वळून त्याच्याकडे पाहिल तसा तो घाबरला आणि मला सोडून दिला.. आणि बाजूला झाला. आता मला घेणाऱ्या एका एकाला निट बघू लागलो . काहींच्या हातात काठ्या होत्या तर काही नुसतेच दूर उभे पाहत होते. त्यातला एक जण होता बिचार्‍याला सरळ उभेही राहता येत नव्हतं. पतंग आकाशात तरंगत असतो अगदी तसा तरंगत होता. त्याला बघून कोणीतरी ओरडलं

"ए बेवड्या बाजूला हो.."

बाकी काही मुली, महिला दूरून फक्त पहात होत्या. सोबतच विचित्र अवतारातील दोन 'हिरो' माझ्याजवळ येऊन आपण जरा जास्त धाडशी आहोत हे अप्रत्यक्षपणे त्या मुलींना सांगत होते. पण मला एकट्याला संपवण्यासाठी एवढी मोठी फौज. त्यात#285327350

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel