बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥
ह्या अजरामर गीताचे कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची आज जयंती.


*प्रसिद्ध विनोदी लेखक आणि नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज जन्मदिन. दि. २९ जून १८७१ रोजी नागपूर येथे त्यांचा जन्म झाला.* इंग्रजी नाटके, कादंब-या वाचण्याची आवड असणा-या श्रीपाद कृष्णांनी मराठी पाचवीत असतानाच ‘सुखमालिका’ नावाचे नाटक लिहिले. वकिली व्यवसायात असतानाच त्यांची साहित्यनिर्मितीही सुरू होती. वीरतनय, मूकनायक, वधूपरीक्षा, सहचारिणी, गुप्तमंजूष, जन्मरहस्य, मतिविकार, प्रेमशोधन, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य व मायाविवाह ही त्यांची गाजलेली नाटके. विनोदपूर्ण आणि काव्यमय शैलीत लिहिणारे कोल्हटकर सन १९२७ च्या पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र साहित्स संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठी साहित्यात विनोदी वाङ्मयाचे जनक म्हणून अजरामर झालेले कोल्हटकर, राम गणेश गडक-यांना आपले शिष्य मानत असत. अण्णासाहेब किर्लोस्करांनंतर मराठी रंगभूमीला आधार देणारा हा नाटककार दि. १ जून १९३४ रोजी आपल्यातून निघून गेला.#285327329
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel