मित्र : अजून जागा आहेस ?

मी : हो रे भाई. या टेन्शनमुळे जागरण वाढलं.

मित्र : हो ना.

मी : तुझी तब्बेत कशी आहे ? रिकव्हरी ?

मित्र : हो. आज पाचवा दिवस ना. बऱ्यापैकी रिकव्हरी आहे.

मी : गुड. काळजी घे रे.

मित्र : हो रे. माझा निष्काळजीपणा नडला.

मी : चलता है. वेळेत निदान झालं, ते महत्वाचं.

मित्र : तेच तर.

मी : सहज मेसेज केलेला ना ?

मित्र : नाही. एक अनुभव शेअर करायचा होता.

मी : बोल ना.

मित्र : ५ दिवसांपूर्वी माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि तातडीने माझ्यावर उपचार सुरू झाले.

मी : हो.

मित्र : त्यापूर्वी मी रविवारी मित्राच्या लग्नाला जाऊन आलेलो. कलीग होता, म्हणून नाही टाळता आलं. नंतर समजलं की, लग्नाला उपस्थित राहिलेल्या इतरांनाही संसर्ग झालेला आहे.

मी : मग ?

मित्र : अरे मला मित्राचा मागच्या आठवड्यात कॉल आलेला. तुला यावच लागेल. मला बाकी काही माहीत नाही. नाही आलास तर बोलणार नाही. असा हट्ट केलेला त्याने.

मी : पुढे ?

मित्र : वास्तविक पाहता, मला लग्न टाळता आलं असतं. पण मी सध्याच्या परिस्थितीला सिरीयस घेतलं नव्हतं. कारण लग्नाचा एरिया ग्रीन झोन होता.

मी : साहजिक आहे.

मित्र : तीच तर मोठी चूक झाली. नेमकं लग्नाला आलेल्या पाहुण्यांपैकी कुणीतरी संसर्गग्रस्त व्यक्ती माझ्या संपर्कात आली. त्यामुळे मला आणि इतर काही जणांनाही, लागण झाली.

मी : ओह.

मित्र : मी घरी आलो, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मला त्रास सुरू झाला. तुला तर माहीत आहे की, आई-पप्पा गेल्याने घरी कुणीच मोठं नाही. दादाची फॅमिलीही लांब आहे.

मी : मग ?

मित्र : मी टेस्ट केली आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याचं टेन्शन डोक्यावर स्वार झालेलं असतानाच, बायकोलाही खोकला सुरू झाला. त्यादरम्यान मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने, तिची एकटीची धावपळ झाली. मात्र तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनाही, तातडीने टेस्ट करायला सांगण्यात आलं.

मी : अरे.

मित्र : सुदैवाने त्या दोघांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि आमच्या दोघांचा जीव भांड्यात पडला. मात्र पुढे अजून एक संकट आमच्यासमोर आ वासून उभं राहिलं.

मी : कुठलं भाई ?

मित्र : आम्ही दोघे दवाखान्यात. मग मुलांना सांभाळणार कोण ? माझी मुलगी ८ वर्षांची आहे आणि मुलगा ४ वर्षाचा. दोघेही लहान, त्यामुळे आम्ही दोघेही अगदी हतबल झालो.

मी : फिर ?

मित्र : अरे जवळच्या सगळ्या लोकांनी हात वरती केले. वरून शेजाऱ्यांनीही साफ नकार कळवळा. म्हणून मग शेवटी, हिच्या एका मैत्रिणीच्या हातापाया पडून त्यांना मनवलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

मी : बरं झालं.

मित्र : अरे पण या सगळ्यात माझा बराच खर्च झाला. आधी सर्वांच्या टेस्ट आणि नंतर ट्रीटमेंट, यामुळे जवळ उरलेले सगळे पैसे संपले. एकतर लॉकडाऊनमुळे कॉर्पोरेटमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत.

मी : हो ना.

मित्र : मग काय. शक्य असेल त्या सगळ्यांसमोर हात पसरले. मात्र सगळ्यांनी नाईलाज सांगितला.

मी : हो ना. सगळेच कोंडीत सापडलेत.

मित्र : अखेरीस खूप अपेक्षेने त्या मित्राला कॉल केला. ज्याच्या लग्नाला त्यादिवशी रविवारी गेलो होतो.

मी : मग ?

मित्र : तू ऐकून शॉक होशील. मात्र एकतर सुरुवातीलाच त्याने पैसे द्यायला साफ नकार दिला. शिवाय शेवटी मला म्हणाला की, तू लग्नाला नसता आला तरी चाललं असतं. उगाच एवढा प्रॉब्लेम करून ठेवलास.

मी : कठीण आहे.

मित्र : तूच बघ आता. म्हणजे ज्याच्या शब्दखातर मी, स्वतःचा जीव धोक्यात टाकून, एवढ्या दूरच्या लग्नाला उपस्थित राहिलो. तोच मला सांगतोय की, उगाच मी तो बावळटपण केला.

मी : अक्कल बंद पडते.

मित्र : भाई कुणी कुणाचं नसतं. हे तेव्हा कळतं, जेव्हा आपण स्वतः संकटात असतो. बायकोने मला थांबवायचा प्रयत्न केला होता. पण माझा हट्ट माझ्याच पश्चातापाचं कारण बनला.

मी : सच बात.

मित्र : म्हणून आजच्या तारखेला, स्वतःपेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करण्याची अधिक गरज आहे. कारण आपली एक चूक, त्या सर्वांचा जीव धोक्यात टाकू शकते.

मी : खरं आहे.

मित्र : आम्ही दोघेही कमावते आहोत. महिन्याला १ लाख रुपये पगार मिळतो आम्हाला. पण आजच्या तारखेला, आमची मुलं जेवलीत की उपाशी आहेत ? याचीही आम्हाला खबर नाही.

मी : नको तसा विचार करू.

मित्र : मनात येतात रे विचार. एवढ्या दिवसात कधी त्या तिघांना स्वतःपासून वेगळं होऊन दिलं नाही. मात्र आज माझ्या एका चुकीची शिक्षा, त्या तिघांना भोगावी लागते आहे.

मी : हो ना.

मित्र : लोक सध्याच्या परिस्थितीला फार कॅज्युअली घेत आहेत. त्यांना तुझ्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा. एखाद्या लग्नाला नाही जाणं झालं. कुणी नाराज झालं, तर आभाळ कोसळणार नाहीये. परंतु तिथे जाऊन जर अनावधानाने तुम्हाला या आजाराचा संसर्ग झालाच, तर मात्र तुम्ही एका संकटात अडकणार आहात. शिवाय तुमच्या मनमानीची झळ, निष्कारण तुमच्या कुटुंबालाही सोसावी लागणा#285327371
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel