*रोज एक बातमी ऐकायला येतेय..*
*आज याच हार्ट अटॅक ने दुःखद निधन, त्याचा अपघात आणि त्यांची वयं काय तर कोण 25 कोण 30 तर कोणाच नुकतच लग्न झालेल !!*
*हे काय वय आहे का जगाला निरोप द्यायच .??*
*आणि या सगळ्याला कारणीभूत आहे आजची जीवनशैली !!*
*किती तो स्ट्रेस !*
*चढाओढ ,सतत जिंकायची स्पर्धा !*
*आपण नक्की कोणासाठी जगतोय ?*
*स्वतःसाठी ? कि पैशासाठी ??*
*जीवन क्षणभंगुर झालय !!*
*तर ते आतातरी खरच जगायची वेळ आलीय, आपल्या आयुष्यावर प्रेम करायची वेळ आलीय. हो चला काही सकारात्मक बदल करूया आयुष्यात*
.

*१. सतत चिडचिड, त्रागा करून कोणाच भलं झालय? ना आपल ना* *समोरच्याच..*
*तर चिडचिडला ठोका रामराम आणि कितीही म्हणजे कितीही स्ट्रेस असला तरी स्वतःला समजवा*
*"सगळ होणार, मी आहे ना " मग सगळ होणार...!*
*शांत व्हा, मस्त मोठा श्वास घ्या आणि हसत कामाला सुरुवात करा !!*


*२.दुसऱ्या बरोबरची तुलना कमी करा ...*
*ती कशी दिसते बघ, तो किती उंच आहे ,*
*माझ्याच बाबतीत अस का ??*
*अशा तक्रारी करणं,बंद करा !!! बंद म्हणजे बंद !!*
*तुम्ही स्वतः युनिक आहात, तुमचं नाक छोट असेलही पण श्वास तर लांब नाक असलेल्या व्यक्ती सारखाच घेताय ना ? तो गोरा मी सावळा !!*
*तर मला सांगा आपला ' *कृष्णमुरारी पण सावळा होताच कि, तरीही तो महान आहे ना, रंग रूपावरून खचुन जाऊ नका !*
*तुम्ही असाल छोटे पण मनाने तर मोठे आहात ना !*
*हो आज पासून कोणाकडेही बघून जेलस व्हायच नाही, तुम्ही स्वतः एक भाग्यवान व्यक्ती आहात जे या सुंदर जगाचा भाग आहात...!!*


*३.टेन्शन लेने का नही आणि ....*
*त्यापेक्षा देनेका तो बिलकुल नही..*
*काळजी करून प्रश्न सुटत नाहीत हे त्रिकाल सत्य आहे, उगाचच कस होईल, काय करू अस म्हणत स्वतःची नखं खाणं कमी करा ..!*
*जिथे संकट असतात तिथे उपायही असतोच फक्त आपल्या चिंतेने तो अजूनच धुसर होत जातो...!!*
*त्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणि समोरच्याला धीर द्या, सगळ नीट होईल,आणि तुमच्या हातात नसेल काही तर जिथे सगळ त्याच्या हातात आहे तर थोडी फार *श्रद्धा त्याच्यावर हि ठेवा... पण श्रद्धाच ठेवा, अंधश्रद्धा नको कारण मंदिराच्या दानपेटीत शंभर रुपये टाकण्यापेक्षा मंदिराबाहेरच्या भुकेल्या जीवांना दिलेला दहा रुपयाचा बिस्कीट पुडा हि तुम्हाला मानसिक शांतता देवू शकतो...!!*
*आता काय ते तुम्ही तुमचं ठरवा...!!😊*


*४. बरेच जण तक्रार करतात, ते बंद करा....!*
*तक्रार करून कशाला स्वतः चा अन दुसऱ्याचा देखील दिवस खराब करायचा !!*
*शेजारी बघा हे घेतल, तिने ते केल....!!*
*अस म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला खचवू नका ...*
*पैसा सगळे कमावतात,अगदी कंपनी चा *एमडी आणि मंदिराबाहेरील भिकारी हि !!!*
*पण त्यापेक्षा तुम्ही नात कमवा,प्रेम कमवा कारण त्याची गरज जास्त आहे सध्या ...*
*पैशाने तुम्ही नसाल श्रीमंत पण समाधानी नक्की बना, बघा किती छान वाटतय...!!*
*आपण आपल्या घरासाठी ढाल म्हणून उभ राहील पाहिजे..*
*घरात रंगीबेरंगी पडदे नसले तरी चालतील पण आपुलकी जिव्हाळ्याने ते घर भरलेलं असाव !!*


*५. कोणाबद्दल मनात राग असेल ना तर तो तसाच खदखदत ठेवू नका !!*
*त्याने तुम्ही स्वतःला वीक बनवू नका तर सरळ जा त्या व्यक्ती समोर आणि एकदाच सगळा राग, त्रास बोलून टाका. त्याने तुमच्या मनाचा भार कमी होईल आणि समोरच्या व्यक्तीलाही समजेल नक्की काय चाललय तुमच्या मनात , पण शक्यतो बोलून प्रश्न सोडवावेत ! "काय" ...!!*
*आणि समजा अस करणं नाही शक्य तुम्हाला, तर सरळ मोठा पेपर घ्या त्या व्यक्तीच नाव मधोमध लिहा आणि जी काही धगधग आहे ती काढा उतरवून...!!*
*आणि नंतर सरळ पेपर फाडून टाका...!!*
*आणि नव्याने सुरुवात करा...!!*
*आणि त्या व्यक्तीकडे आता नव्याने पाहायला सुरुवात करा !*
*बघा तुम्हालाच बरं वाटेल !!*
*आणि कोणी आवडत असेल तरीही एक तर हिम्मत करून भावना बोलून दाखवा जे होईल ते होईल एक तर हो नाहीतर नाही. तुम्ही टेन्शन घ्यायच नाही. नाही बोललीच समोरची व्यक्ती तर वाईट वाटून घ्यायच नाही, रडायच तर मुळीच नाही फक्त एवढाच विचार करायचा "जाऊ दे तिच/त्याच नशीब खराब कि त्यांनी तुमच्या सारख्या व्यक्तीला नाकारलं....!!!*
*आणि अस होत नसेल तर त्या व्यक्तीला सरळ विसरून जा उगाच मनाच्या कोपऱ्यात वगैरे ठेवून तिला गंजून देण्यापेक्षा नव्या आशा पल्लवित करा...!!*
*जरा नजर फिरवा नक्की कोण ना कोण *भाग्यवान तुमच्या साठी वाट पाहत असेल....!!!*
*बघा नक्की !!*
••

*६. समोरच्याच म्हणण ऐकून घ्या, उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी गैरसमज टाळा, उलट छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायला शिका !!*
*कोणी आपल्या बद्दल वाईट बोलतय ना,तर बोलू दे ! उगीच आकांडतांडव करून त्या व्यक्तीशी भांडू नका ! एक तर ती व्यक्ती#285327414
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel