ा मजल्यावर महाकालेश्वर, तिसऱ्या मजल्यावर सिद्धेश्वर, चौथ्या मजल्यावर गुप्तेश्वर आणि पाचव्या मजल्यावर ध्वजेश्वर अशा पाच शिवलिंगांचे स्थान आहे! इतरही देवतांचा वास या मंदिरात आहे.

ओंकारेश्वर मंदिराच्या तळाशी एक गुंफा आहे. या गुंफेत बटूवेशातील शंकराचार्य आणि त्यांचे गुरू यती गोविंदपादाचार्य यांचे शिल्प आहे. शिल्पा मागील कथा अशी आहे ......‌दिवस पावसाळ्याचे आहेत .......... गुंफेत गुरु साधनेला बसले आहेत ......... नर्मदेचे पाणी क्षणा क्षणाला वाढत आहे ....... रोरोवणारी नर्मदा गुंफेत शिरू पाहतेय ........ लहानग्या शंकराला आपल्या गुरूची काळजी वाटतेय् आणि तो नर्मदेची स्तुती गाऊ लागतो ........

सबिंदु सिंधू सुस्खलत्
तरंग भंग रंजितं
द्विषत्सु पाप जातजात
कारिवारी संयुतम्
कृतांतदूत कालभूत
भितीहारी वर्मदे ......
माते नर्मदे , मी तुझ्या चरण कमलांना वंदन करतो ........
आणि नर्मदेचे जल तो आपल्या कमंडलूत धारण करतो !
एका निष्पाप- निर्मळ सादेला नर्मदा मैया प्रतिसाद का देणार नाही? मैयाचा जल ओघ मंदावतो आणि यती गोविंदपादचार्यांना सनातन धर्माच्या पुनरूज्जीवनसाठी एक सुयोग्य शिष्य प्राप्त होतो!

नर्मदेच्या दक्षिण तटावर असलेला ममलेश्वर हा ओंकारेश्वराचा अर्धा भाग आहे. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मिळून एक पूर्ण ज्योतिर्लिंग होते! तर हे ममलेश्वर मंदिर देखील तेवढेच महत्त्वाचे आहे ... जेवढे ओंकारेश्वर मंदिर आहे! इसवी सन १०६३ मध्ये मंदिराच्या भिंतींवर कोरलेले शिव महिम्न स्तोस्त्र आजही उत्तम अवस्थेत आहे! तटबंदीच्या घेऱ्यात असलेल्या ममलेश्वर मंदिर परिसरात एकूण सात मंदिरेही आहेत.जी प्राचिन वास्तुशिल्प कलाकृतींचे उत्तम उदाहरण आहे!

ममलेश्वर मंदिरा पासून काही अंतरावर नर्मदेच्या दक्षिण तटावर गोमुख आहे! ज्यातून अखंड जलस्त्रोत वाहत असते. या गोमुखातून वाहणारे जल जेथे नर्मदेला मिळते त्या स्थानाला "कपिल धारा संगम" म्हणतात!
ओंकारेश्वराचे महात्म्य वाढविणारे अजून एक स्थळ म्हणजे नर्मदा-कावेरी संगम! या कावेरीचा नर्मदेशी प्रथम संगम होतो तो ओंकारेश्वरच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर! पण कावेरी तेथे नर्मदेत न सामावता मांधाता बेटाला वळसा घालून नंतर तिचा संगम नर्मदेशी होतो! म्हणूनच ज्योतिर्लिंगाच्या चरणाशी असलेल्या या संगमाचे फार महत्त्व आहे! दक्षिण तटावर कावेरीची जेथे नर्मदेशी प्रथम भेट होते ना , तेथे पूर्वी कुबेराचे मंदीर होते. इथे शिवाला प्रसन्न करण्यासाठी कुबेराने तपश्र्चर्या केली होती. शिवाने प्रसन्न होऊन त्याला देवांचा "खजांची" तर बनविलेच पण लोकपालाची जबाबदारीही दिली! असं म्हणतात की, कुबेराच्या स्नानासाठी शिवाने आपल्या जटेतून तेथे कावेरी उतरवली!ते पूर्वीचे मंदिर आता ओंकारेश्वर धरणांमध्ये बुडाले आहे. आता नर्मदेच्या दक्षिण तटावर ओंकारेश्वर धरणा जवळ कुबेराचे नवीन मंदीर बांधले आहे! जेथे आजही धनतेरसच्या दिवशी यज्ञ होतो आणि कुबेर यंत्र लोकांना वाटले जाते!

ओंकारेश्वरला गेल्यावर मी एक गोष्ट आवर्जून करण्याचा प्रयत्न करतो , ते म्हणजे मांधाता परिक्रमा! असं म्हणतात की,सत्ययुगात हे बेट चकाकणाऱ्या मण्याप्रमाणे होते. नंतर त्रेता युगात हे बेट सुवर्णमय होते. आणि द्वापार युगात तांब्याने युक्त असलेले हे बेट आज पाषाणी पर्वत आहे! जेव्हा आपण मांधाताची परिक्रमा करतो तेव्हा ओंकारेश्वरासह अनेक तीर्थक्षेत्रांची परिक्रमा आपल्या कडून होते! केदारेश्वर, ओंकारमठ, आनंदमयी मां आश्रम, कावेरी संगम, ऋण मुक्तेश्वर,राजराजेश्वरी माता, गौरी सोमनाथ, लेटा हनुमान , सिद्धनाथ मंदिर, भृगू पत्तन...... अशी अनेक पवित्र स्थळे या परिक्रमा मार्गात आहेत! मांधाता पर्वत म्हणजे ओंकारेश्वराचा तेजोगाभाच आहे!

ओंकारेश्वर मंदिरात ज्या नित्य पूजा होतात, त्या ठरलेल्या पद्धतीनेच होतात. दिवसातून तीन वेळा दूध - दही आणि नर्मदा जलाने ओंकारेश्वरला अभिषेक होतो. ओंकारेश्वराची सकाळची पूजा ही मंदिराच्या विश्र्वस्तांच्या ( ट्रस्ट) मार्फत होते. दुपारची पूजा सिंधीया घराण्यांच्या नावाने होते. तर सायं पूजा होळकर घराण्यां कडून होते! आणि रात्रीची शेजारती तर बघण्यासारखी असते!

असा विश्वास आहे की, शिवजी माता पार्वती सह रोज रात्री इथे विश्रांतीला येतात. त्यासाठी ओंकारेश्वराच्या गाभाऱ्यात आजही रोज बिछाना घातला जातो आणि करमणूकीसाठी सारीपाटाचा डावही मांडला जातो! आजही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कडून सहस्त्रावधी पार्थिव शिवलिंगांचे नर्मदेत विसर्जन होते!( सदर लिंगाची विधीवत पूजा करून , नेमलेल्या सात पंडितां कडून पार्थिव शिवलिंगांचे नित्य विसर्जन केले जाते.) आजही हजारो भाविक ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी श्रद्धेने येतात......
खरं सांगायचं तर, ओंकारेश्वराची महती हि शब्दातीत आहे! आपण इथे आल्यावर फक्त नर्मदेत स्नान करायचे ....... ओंकार-ममलेश्वराचे दर्शन घ्यायचे ..... असलेल्या इतर अनेक तीर्थस्थळी माथा टेकवायचा ......... आणि इथली माती कपाळाला लावायच#285327418
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel