यंदाचा अंक हा कथा विशेषांक आहे. या अंकात वेगवेगळ्या धाटणीच्या कथा वाचकांना वाचायला मिळतील. आरंभ कथा स्पर्धेचा निकाल या अंकातून जाहीर करत आहोत. विजेत्यांचे मनापासून अभिनंदन तर सर्व लेखकांचे ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, आपल्या कथा पाठवल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. यंदाच्या अंकापासून एक नवीन प्रयत्न करत आहोत. या साहित्याच्या प्रवासात आपल्याला आरंभयात्री सोबत करणार आहे. अंकाच्या विषयाला साजेसा असा हा आनंदयात्री असेल. त्यांचे मार्गदर्शन आपल्या सर्वाना नक्कीच फायद्याचे ठरेलही खात्री आहे. या नव्या उपक्रमासाठी वाचकांचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. त्यामुळे वाचकांकडून याबद्दल प्रतिक्रिया येतील, सुधारणा समजतील, कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील, ही आमची अपेक्षा.