निमिष सोनार यांनी याआधी लिहिलेल्या 'वलय' ह्या सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित "सिनेमा स्कोप" कादंबरी ची प्रस्तावना मी लिहिली होती. डिटेक्टिव्ह निगेटिव्ह या सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरीला प्रस्तावना लिहिण्याचे दुहेरी भाग्य मला मिळाले याबद्दल निमिष सोनार यांचे शतशः आभार! नोकरी आणि घर सांभाळून ते आपली लेखन जिज्ञासा जोपासतात. त्यांनी आतापर्यंत आरंभ त्रैमासिकाचे संपादक म्हणून फार मोठी जबाबदारी समर्थपणे सांभाळली. या सर्वातून वेळ काढून त्यांनी ही नवीन कादंबरी प्रेक्षक वर्गासमोर आणली यासाठी यांचे कौतुक करावे तेवढे कमी!

सायन्स फँटसी हा साहित्याचा प्रकार मराठीत तसा दुर्मिळ. पाश्चात्य जगात यावर अनेक कथा नि कादंबऱ्या लिहिल्या जातात तसेच वाचकवर्गही बराच मोठा आहे. निमिष यांनी यापूर्वी जलजीवा, अपूर्ण स्वप्न, शापित श्वास इत्यादी कल्पनारम्य विज्ञान कथा नि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मराठीत ह्या साहित्य प्रकार आधारित लेखन करणारे जे मोजके लेखक आहेत त्यांत निमिष सोनार यांचे नाव अग्रगण्य राहील यात वादच नाही.

डोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते. ह्या शक्तीबद्दल वाचताना स्पायडरमॅन चित्रपटातील "With great power comes great responsibility" हे अंकल बेनचे वाक्य तुम्हाला नक्कीच आठवेल. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा "वांद्रे वरळी सी लिंक" वर अपघात होतो. जपानचे संशोधक अचानक बाथरूम मधून गायब होतात. सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग "विसरता" येत नाही.

नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते? लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते? कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक कादंबरीतून नक्कीच मिळतील. निमिष यांची लेखणी आणि शब्दचातुर्य इतके भारी की कथानक वाचताना मला हॉलिवूड चे चित्रपट The Matrix, Avatar, Terminator, स्टीव्हन स्पीलबर्ग यांचे चित्रपट तसेच Super Heroes चे असंख्य चित्रपट आणि त्यातील देखावे प्रत्यक्ष डोळ्यासमोर आले! कादंबरी एकदा हातात घेतली की कथानक आणि कहाणी तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करून सोडेल. अशीच मेजवानी ते आपल्याला देत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

- सिद्धेश प्रभुगांवकर,
https://bookstruck.app
https://www.facebook.com/bookstruck.in

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel