पूर्वी कोसल राज्याच्या राजधानीत भैरवशासी नावाचा एक वाक्पटु रहात असे. त्याचे वाक्चातुर्य सर्वानाच आकर्षित करून घेई. फारसा शिकू शकला नाही, तरी तो आपल्या चातुर्यपूर्ण बोलण्याने सर्वाना खूप हसवत असे. त्याचा मेहुणा राजाच्या दरबारी पंडितांपैकी एक होता. ब्रह्मचारी भैरव या मेहुण्याच्या घरीच रहात असे. एक दिवरा मेहुणा आपल्या बायकोला- भैरवच्चा बहिणीला म्हणाला, "स्वर्णचन्द्रिका ही महाराजांची एकुलती एक कन्या आहे. महाराज सध्या तिच्या विवाहाच्या प्रयत्नात आहेत. त्यांची इच्छा आहे की, वैदेहीच्या राजपुत्राला आपला जावई बनवावा. पण तुला तर माहीतच आहे की, वैदेही राज्य आपल्यापेक्षा मोठं अन् संपन्न आहे. त्यामुळे तो राजा या विवाहाला संमती देईल की नाही, याबद्दल महाराजांना शंका आहे."

भैरवशालीची बहीण म्हणाली, "का नाही होणार तवारी यात शंकेला काही जागाच नाहीय, आपल्या भैरवला तिथे पाठचीन मी. आपलं वाक्-चातुर्य आणि हास्यपूर्ण शब्द याचा धडाधड अपयोग करून तो सूर्यास्तापूर्वीच त्यांना विवाहासाठी तयार करील अन् हे स्थळ पकं करून परत येईल पहा!" "हो तर! शिक्षण-क्षेत्र सोडून बाकी मान्य क्षेत्रात तुझा भालू समर्थ आहे!" असे बोलून भैरवजा मेहुणा खदाखदा हसला. भैरवशासी त्यांचे हे संभाषण लक्षपूर्वक ऐकत होता. मनातल्या मनात त्याने वैदेहीला जाभून हे काम सफल करूनच यायचे ठरवले. 'या कार्यात सफल झालो, तर महाराज मला नकीच काहीतरी मौल्यवान भेट देतील.' असे त्याला वाटले. दुसऱ्याच दिवशी सकाळी कोणाला न सांगता तो वैदेहीला जायला

निघाला. त्याच्या अंगात खूप जुत्साह भरलेला होता, अन् आपल्या ध्येयपूर्तीबद्दल मनात आशा होती. कोसल व वैदेही या राज्यांच्या मधे एक घनदाट अंगल होते. या जंगलात एक राक्षसी रहाते असे प्रजेला कायम भय वाटत असे. त्यामुळे लोक या जंगलातून न जाता दुसन्या एका जरा लांबच्या पण लहानशा जंगलातून जात असत. सरोवराजवळ पोचला, पाणी पिशून त्याने तहान भागवली. अतिशय थकल्यामुळे एका झाडाखाली तो विधांती घेत बसला. हळूहळू निद्रादेवीने त्याच्यावर कृपा केली. त्याच वेळी एक म्हातारी राक्षसी तेथे आली. तिच्या पावलांच्या आवाजाने जमीन दुभंगत असल्यासारखे वाटत होते. गरजत तो म्हणाली, "हे सरोवर भैरव जातीच्या राक्षसांचं आहे. तू इथे यायचं साहस कसं केलंस? हे पाणी पिणारा तू कोण?" घाबरतच भैरवशास्त्री अभा राहिला. मृत्यु अटळ आहे, याची त्याला खात्री बाटली.थरथरत दीन स्वरात तो बोलला, "राक्षसीमाते! माझं नाव आहे भैरवशास्त्री, भैरव जातीच्या तुम्हा लोकांची भूक भागवण्यासाठीच बहुधा देवानं मला इथं पाठवलं असलं पाहिजे. पूर्वजन्मी आपलं दोघांचं गोत्र एकच असावं. तुला हे सत्य तर माहीतच असेल, की सगोत्र लोकांचं मांस खाणं निषिद्ध आहे. पंडितांनीही आपल्या शासात ही गोष्ट वारंवार सांगितलेली आहे.' भैरवचे हे बोलणे ऐकून राक्षसी जोराने हसत टाळ्या वाजवू लागली आणि दुसरी एक तरुण राक्षसी झाडाआडून तेथे आली. तिने

 

भैरवशास्त्रीकडे निरखून पाहून घेतले. नंतर ती आपल्या आईला म्हणाली, "आई, मी तुला अगोदरच सांगितलं आहे. आपण भैरव खोयात असताना भिल्ल जातीच्या एका बाईन आपल्याला अन्य प्राण्यांचं मांस शिजवायला शिकवलं होतं. पण माणसाचे मांस शिजवायची पद्धत मला माहीत नाहीय." तरूण राक्षसीचे बोलणे ऐकता ऐकता भैरवशास्त्रीला एक अपाय सुचला. स्तुती. भरल्या होज्यांनी तिच्याकडे पहात तो म्हातारीला म्हणाला, "रूप-रंग वगैरे सोडून दे, पण तुझी मुलगी सौंदर्यात गंधर्वकन्यांनाही मागं टाकणारी आहे. नाव काय सांगितलंस आपलं? अजून लग्न नाही झालं न?" मृत्यु टाळायच्या आशेने तो काहीतरी बोलला. "नाव आहे चतुरसुंदरी, हिच्या लग्नाच्या

 

गडबडीतच तर आम्ही ते खोरं सोडून इथे आलो. तिथले राधास 'चतुरसुंदरी माझी आहे, माझीच होभून राहील.' असं म्हणत आपसात भांदू लागले, अन् त्यांची भांडणं थांबेनात. त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी मुकाट्यानं आम्ही इकडे निघून आलो. नाहीतर आम्हाला भीती पडली होती की, भैरव खोऱ्याच्या राक्षस जातीचा कायमचा अंत होजून जाईल." म्हातान्या राक्षसीने सांगितले. हात जोडून आकाशाकडे पहात भैरवशास्त्री म्हणाला, "आहा! देवाची लीला कशी असते, हे कोणाला माहीत?" अन् क्षण भर डोळे बन्द करून पुन्हा अपडत तो म्हणाला, "आपल्या चतुरसुन्दरीला योग्य असा एक राक्षस इथून कोसभर दूर असलेल्या दाट जंगलात रहातो. तू 'होम' म्हणलीस, तर मी त्यालाही 'होय' म्हणायला लावीन

" बष" त्याचे बोलणे ऐकून अत्यन्त खूश होत म्हातारी राक्षसी म्हणाली, "अरे ए माणसा! तू किती चांगला माणूस आहेस! तू हा विवाह पक्का करून विलास, तर मी तुला अगणित हिरे-जवाहिर देईन!" "तुझ्यामुळे मला केवळ धन प्राप्तीच होईल असं नव्हे, तर विवाह जमवून देण्यात यशस्वी झाल्यावर पुण्य प्राप्तीही होईल.' असे म्हणत भैरव तेथून निघाला. वैदेही राज्याकडे जाता जाता तो एका झाडाखाली जसून गंभीरपणे विचार करू लागला. थोडा वेळ विचार केल्यावर भैरवशास्त्रीने एक निर्णय घेतला-कोसल व वैदेही राज्यात संबंध जोडून देण्याचा निश्चय म्हणजे केवळ भमच आहे माझा ! अतिलोभाचं हे काम असाध्यही आहे! म्हाताऱ्या राक्षासीला आपल्या गोड बोलण्यानं आपण जसं आपल्या बाजूचं केलं, तसं त्या दाट जंगलातल्या राक्षसालाही आपण वश करून घे. त्यालाही आशा दाखवून विश्वास संपादन केला तर त्याच्याकडूनही काही धन हरूपता येईल तेथून झुठून वेगाने तो दाट जंगलात पोचला. तिथल्या राक्षसाची गुहा शोधायला त्याला विशेष प्रयास पडले नाहीत; कारण बाहेर खूपशा प्राण्यांचे अस्थिपंजर परलेले होते. गुहाही जवळच होती. भैरवशास्त्रीने मनःपूर्वक आपल्या इष्ट देवतेचे स्मरण केले अन् निर्भय होशून तो गुहेसमोर बुभा राहिला. छानपैकी घोरत राक्षस गाढ झोपलेला होता. भैरवशास्त्री अञ्च स्वरात ओरडला, "राक्षसप्रभु! मी आहे भैरवशास्त्री, तुझं कल्याण करायला आलोय!" राक्षस ताबडतोब झुठून बसत ओरडला, "माझ्यासारख्या मोठ्या राक्षसाला अठवायचं धाडस केलंस तू? तुझ्या धाडसाला वाव देतो मी! त्याबद्दल सूश होभून तुला हिरे-जवाहिर बक्षिस द्यायचा विचार आहे माझा. बघ इथे कोपऱ्यातच पडलेले आहेत! पण थुपयोग काय? तासाभरानंतर तू या जगात नसणार; परलोकात पोचलेला असशील तू!" राक्षसाच्या बोलण्याने भैरवशास्त्री मनातल्या मनात खूप घाबरला; पण भय लपवून तो म्हणाला, "राक्षसप्रभुच्या प्रशंसेला पात्र झालो, हेच खूप झालं मला! कृतज्ञ आहे मी! पण राक्षस-संप्रदायानुसार आपलं भलं करणाराला त्रास देणं पाप आहे, आत्मद्रोह आहे तो! राक्षस जातीला कलंक ठरेल तो! तुम्ही आत्ताच झोपेतून जागे झालात ना, म्हणूनच ही रीत तुमच्या ध्यानात आली नसावी!" त्याचे बोलणे ऐकून राक्षस हसत म्हणाला, 'भैरव! तुझ्या वाक् चातुर्याची स्तुती करावी, तितकी थोडीच ठरेल, पण तू आपल्या प्राणांची पर्वा ने करता इतका दूर चालत आला आहेस. बोल, कोणत्या कामासाठी आलायस?" "तुमच्यासाठी एक वधु निवडून आलोय." भैरव हसत बुत्तरला. "लग्न! वधु! बरंच बोलतोयस, की चेष्टा करतोयस माझी? मला तर वाटलं होतं की, या घंटाकंठच्या नशिबी हे भाग्य लिहिलेलंच नाहीय!" आश्चर्य प्रकट करत राक्षस म्हणाला. "हे घंटाकर प्रभु! जन्म-पविकाही कधी कधी कालसंदर्भामुळे बदलल्या जातात. मी ज्या कामासाठी इथे आलोय, ते असं आहे- असे म्हणून भैरवने ती म्हातारी राक्षसी व चतुरसुन्दरी यांची हकिकत त्याला सांगितली.

 

ते ऐकून राक्षस आनन्दाने झुझ्याच मारू लागला! "वा, वा! चल आत्ताच; बस माझ्या खान्द्यावर ! त्या जंगलात ताबडतोब जाबू आपण!" असे म्हणत तो भैरवला घेशून जायला भुतावळा झाला. भैरवशारखीने भराभरा गुहेजवळ पडलेली काही रत्नं आपल्या अपरण्यात गुंडाळली अन् घट्ट गाठ मारली. नंतर तो राक्षसाच्या खांद्यावर बसला. अंधार पसरण्यापूर्वीच ते त्या छोट्या जंगलात पोचून तरुण राक्षसीच्या निवासाजवळ गेले. तरुण राक्षस घंटाकरला येताना पाहून राक्षसी चतुर-सुन्दरी आपल्या आईला म्हणाली, "छान झालं बघ, अंधार पडण्यापूर्वीच इथे पोचलाय हा! नाहीतर त्याचं रंगरूप पहाता आलं नसतं मला. इतक्यात राक्षस व भैरवशास्त्री दोघे त्यांच्याजवळ पोचले. चतुरसुन्दरीला पहाताच राक्षस म्हणाला, 'वा! सौंदर्याचा जिवंत नमुनाच म्हणायला हवा हा! राक्षस-रूपातली मोहिनीच वाटतेय की ही! मी तयार आहे या लग्नाला!" म्हाताऱ्या राक्षसीने कन्येला विचारले, "बोल, तुझं काय मत आहे?" "नवऱ्याची इच्छा, ती माझी पण इच्छा आहे." असे म्हणून चतुरसुन्दरी दोन पावले मागे सरकली. मुलीचा हात पकडून म्हातारी राक्षसी तिला घेशून घंटाकंठ राक्षसाजवळ आली, अन् तिने तिचा हात घंटाकंठच्या हाती दिला. "पाणिग्रहण झालं; म्हणजे विवाहच झाला समजा." असे म्हणून टाळ्या वाजवून भैरवशास्त्री म्हातारीला म्हणाला,

 

"राक्षसीमाते! माझं बक्षिस विसरली तर नाहीस ना?" "ते कसं विसरेन?" असे म्हणून म्हातारीने हिरे, रत्ने आणि जबाहिरांना भरलेली एक पोटली त्याच्या हवाली केली. राक्षसाची रत्नांची पोटली एका खांद्याला अन् म्हातारीची दुसऱ्याला अशी लटकावून भैरवशास्त्रीने हात जोडून त्या दोघांना नमस्कार केला, डोके अचलून आकाशाकडे पहात तो राक्षसाला म्हणाला, "राक्षसप्रभु! तुम्ही एकटे नव्हेत, गृहस्थ आहात. एक रहस्य सांगून मी राजद्रोह करत आहे, हे मला ठाजूक आहे. पण तुम्हाला सांगणं हा माझा धर्मही आहे. आमच्या राज्यात असणारे पाणी तुम्ही अनिबंधपणे मारून खात असता, मानवांनाही तुम्ही सोडत नाही. हे आता महाराजांच्या ध्यानात आलं आहे. तुम्हाला मारून टाकण्यासाठी ते ससैन्य इकडे, येत आहेत. तुम्ही तिघंही आजच रात्री भैरव घाटीकडे जाणं जमणार नाही, पण शार्दुल खोयाकडे निघून जा अन् स्वतःचं रक्षण करा. घंटाकंठ जोराने हुंकार भरत अन् जमिनी वर पाय आपटत म्हणाला, "मानवांना भिजून आपली गुहा सोडून पळून जाभू मी?" भैरवशास्त्री विनयाने म्हणाला, "राक्षसप्रभु, याला 'पळून जाणं' म्हणता येणार नाही. तुमचं कुटुंब आता मोठं झालंय, त्याला अनुरूप अशी प्रशस्त जागा तर हवी ना? ती गुहा तुमच्या गृहस्थ-जीवनाला योग्य होणार नाही. तसं तर तुम्हाला फार दूरही जावं लागणार नाहीय. बास, कोसलची सरहद्द ओलांडून जरा दूर जासून रहाणार आहात तुम्ही," इतके बोलून त्याने नंतर म्हातारीकडे पाहिले. म्हातारी राक्षसी म्हणाली, "भैरवना सल्ला योग्यच आहे. चला, जामू या आपण इथून!" ते तिघेही तेथून निघाले. जावई आणि मुलगी म्हातारीच्या मागे-मागे चालत राहिले. आपल्या सांद्यांवर लटकणान्या पोटल्यांच्या वजनामुळे धापा टाकत भैरवशाखी स्वतःशीच बोलू लागला, "दारिद्य काही ओझं नव्हे, पण कधी कधी धनाचं ओझंही माणसाला दमवतं खरंच!" अन् हसत हसत तो आपल्या नगराकडे चालू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel