गाईचा पाळणा गाय भरुन गाईच्या मांड्या ग जशा पालखीच्या दांड्यागोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचा शेपा  ग जसा नागीण टाकी झेपागोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईच पोट ग जशी कापसाची मोटगोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईची कास ग धार काढी रामदासगोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचं दुधु ग आज जेवण झालं सुधुगोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचं दही ग आज जेवण झालं लई गोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचं ताक ग आज जेवण झालं पाकगोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचं तुपु ग आज जेवण झालं खुपुगोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईची पाठ ग जशी स्वर्गाची वाटगोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचा डोळा ग जसा लोण्याचा गोळागोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचं नाक ग जसं कोल्हापूरचं मापगोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचं तोंड ग महादेवाचीं कुंडं गोकुळच्या नारी ।गाय भरुन गाईचं कपाळ ग जस महादेवाचं गोपाळ गोकुळच्या नारी ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel