सासू सुनेवं भांडण । राईनीं सारवून सुरवून ।राईनी धुणं गोळा केल । गेली यमुना नदीला ।राईनी धुण जी धुतील । राईनी वाळत घातीलं ।काढला अंगावरला अळींकार । राईनी आंघुळ जी केली ।नेसली पिवळं पीतांबर । घातली मदमा काचोळी ।राईनी धुणं गोळा केलं । राईनी गाठोडं बांधीलं ।आली आपल्या घरला । राईनी धुणंजी ठेवीलं ।घेतलं खुंटीचं आईन । तोंड न्याहाळाया लागलं ।सर्व शीनगार आहे । गळ्यांतील हार नाहीं ।राई धावत धावत । गेली यमुना नदीला ।राई - " अग अग यम्नाबाई । इथं आलं होतं कोण?"यमुना - " आला होता गोविंदादेवा । " राई धावत पळत । गेली गोविंदाजवळी ।राई - अर अर गोविंदादेवा ।हाराची हारकी काय ग देशी । देईन नाकांतील नथ ।नाही नथजी लागत । राई तुमची आगत ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel