मिळल साथीशी गोपाळ । डाव चेंडूफळीचा मांडिला ।चेंडू बाळाचा उडाला । जमना बाईला बुडाला ।हरी रडत फुंद्त । आला देवईजवळीं ।देवकी - " कुणी र डोळ्यानं दापीलं ? त्याचा डोळा मी काढीन ।कुणी र बोटानं दापीलं ? त्याचं बोट मी मोडीन ।कुठला काटा र मोडला ? तिथली कुपाटी झॊडीन ।कुठला खडा र टोचला ? तिथली विदाई झाडीन अन काय मागशी मुरारी? देईन तुजला श्रीहरी"कृष्ण - " इस्त्यावाचून पोळी देग बाई मजला भाजून "देवकी - "अन काय मागशी मुरारी? देईन तुजला श्रीहरी।"कृष्ण - " आगाशीचा चांद दे बाई मजला धरुनी ।"देवकी - " अन काय मागशी मुरारी ? देईन तुजला श्रीहरी।"कृष्ण - " रांजण फोडून पाणी दे बाई मजला काढूनी ।"देवकी - " अन काय मागशी मुरारी? देईन तुजला श्रीहरी।"
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel