तुझ्यासोबत पुन्हा एकदा मनसोक्त जगावेसे वाटते,
रंगपंचमीच्या दिवशी,  तुझ्या हातून माझ्या गालांना
पुन्हा एकदा रंगावेसे वाटते .
कधीकधी तेंव्हासारखी आयती चित्रे रंगवत आपण एकाच बेंचवर बसावेसे वाटते ,
तेंव्हा खुपजण होते वर्गात आपल्या शेजारी ;
आता थोड्या वेळासाठी कोणीच जवळ नसावेसे वाटते.
आपण दोघांनीच असावेसे वाटते.

तू गुपचूप मागून येऊन माझ्या
डोळ्यांवर हात ठेवायचीस ,
आणि मी पुन्हा मुद्दाम तुझ्या मैत्रीणीचेच नाव ओळखावेसे वाटते .
तू मला वारंवार हळूच मारायचीस
आणि मला तुला मारताना
पुन्हा एकदा घाबरावेसे वाटते.
तुझ्यासोबत हसणे,बोलने ,चिडणे,चिडवणे
खेळणे ,भांडण करणे यांसाठी मला
पुन्हा एकदा थोडावेळ तरी भुतकाळात जावेसे वाटते.आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel