द अपसाईड डाऊन किंग: अनयुजुअल टेलस् अबाऊट रामा अँड कृष्णा हा २३ पौराणिक लघुकथांचा संग्रह आहे. ह्या लघुकथा दोन भागांत विभागल्या गेल्या आहेत. पहिला भाग प्रभु श्रीरामाच्या आयुष्याशी निगडित आहे, तर दुसरा भाग श्रीकृष्णाचे आयुष्य आणि त्याचा वंश यांचे वर्णन करतो. जेव्हा देव आणि असुर या पृथ्वीवर होते, जेव्हा प्राणी बोलु शकायचे आणि देव आपल्या भक्तांना तेजस्वी वरदान द्यायचे तो काळ साक्षात जगल्याचा अनुभव या कथा वाचताना येतो. या कथांचे कथानक आपल्याला पुस्तकात गुंतवुन ठेवते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.