फेब्रुवारी या प्रेमाच्या महिन्यानिमित्त या अंकाचा विषय होता 'प्रेम म्हणजे प्रेम असतं.....पण तुमचं आमचं सेम नसतं' सेम का नसतं तर प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा वेगळी असते. प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत, प्रेम व्यक्त करण्याची पद्घत वेगळी असते. ही प्रेमाची परिभाषा समजून घेण्यासाठी, त्यावर चर्चा होण्यासाठी हा विषय निवडला. युद्ध, वाद, दहशतवादी हल्ले आणि द्वेष पसरवणाऱ्या सर्व गोष्टी कायमच्या संपवून टाकण्यासाठी आणि जगभरात फक्त आणि फक्त प्रेमच राहायला हवं, यासाठी प्रेमावर भरपूर चर्चा होणं, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या समजून घेणं, अनोळखी लोकही प्रेम या एका ओळखीच्या धाग्याने जोडले जाणं महत्त्वाचं. जगभरात ठिकठिकाणी हे प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नात आपलाही हा खारीचा वाटा.