अंकुश फोपसे
उमलतील कधी ही
माझ्या अबोलीची फुले,
फुलला असून बगीचा
मन अबोलीसाठीच झुले....
नाजूक स्पर्श फुलांचा
हवाहवासा वाटे,
कळेना मजला अजून
असती का येथेही काटे??
नेहमीच यत्न माझा
अबोलीस फुलविण्याचा,
सांगू कसे फुलास त्या
तू श्वास माझ्या जगण्याचा.....
जाण फुला ही व्याकूळता
तुझ्यासाठी जगणाऱ्याची,
वाट पाहतो आतुरतेने
भ्रमर तुझ्या या फुलण्याची....
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.