हनुमान जन्मोत्सव हा हिंदुंचा एक महत्वाचा सण आहे. हनुमान हा प्रभु श्रीरामाचा निश्चयी भक्त होता. त्यामुळे ज्या देशात रामनवमी उत्साहात साजरी होते तेथे हनुमानाचा जन्मोत्सव ही फार मोठा साजरा होतो. हनुमान हा शक्ती आणि असीम उर्जेचे प्रतिक मानला जातो. रामावरची निस्सीम भक्ती हनुमानाच्या या गुणांचे सौंदर्य वाढवते. हनुमान आपल्या इच्छेने आपला आकार कमी-अधिक करु शकत असे. हनुमाने शस्त्र गदा होते. हनुमान पवनपुत्र असल्याने अवकाशात क्षणार्धात झेपावत असे. अपार शक्तीचा धनी असल्याने पर्वत हलवु शकत असे. रामायणात याचा उल्लेखही आहे. हनुमानाने संजीवनी पर्वत आपल्या एका हातावर उचलुन आणला. हनुमानाच्या अंगी गरुडाप्रमाणे चपळता होती. आपल्यालाही हाती घेतलेली कार्ये सिद्धीस नेण्यासाठी हनुमानाप्रमाणे निश्चयी व्हावे लागेल. आपल्याला हनुमानाप्रमाणे चपळ आणि स्थितप्रज्ञ व्हावे लागेल. हे आपण आचरणात आणावे म्हणुन आपल्या पुर्वजांनी हनुमान जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. आपल्या समोर एखादे आदर्श बसवले की आपण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. म्हणुन आपण देव देवतांच्या जयंती साजरी करतो. म्हणजेच आपल्याला आपले आदर्श मजबुत करायला एक संधी मिळते.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel