अंतरंगात माणूस
विठ्ठलासम दिसला मला,
साद जेव्हा दिली
प्रतिसाद नव्हता मला..

कर्म आपली निष्पाप
लावली पापे मला,
कामा इतकेच लोकं
गेली वापरून मला...

म्हणतात दडला गीतेत
अर्थ लिहलेला,
शोधून न कळला
अर्थ माणसाचा मला...

अंकुरनार होतो बघून
अंध डोळ्यात तुला,
जाळून गेली उघड्यावर
आपलीच माणसं मला...

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel