फुले बघा सुंदर किती
नाजूक त्याच्या छटा,
कोसळून मातीतं गारा
झाल्या पांढऱ्या वाटा..

घोंगावतात वाऱ्यासंग
शुष्कपर्ण उंच नभाशी,
तोडून सारी नाती
या काळ्या मातीशी...

राना वनातून धावतो
गार-गार वारा,
जेव्हा कोसळतात येथे
पावसात गारा..

गारा खाऊन मन
चिंब ओलं झालं
तुझ्याच आठवणीत
सांजवेळी अबोल झालं...

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel