दृढनिश्चय आणि आक्रमकता यांच्यातील फरक यावर आज जरा काही चर्चा करण्याची गरज आहे.

आक्रमकपणे वागणारे लोक  चांगल्या लोकांवर वर्चस्व ठेवतात हे व्यावसायिक संबंधांमध्ये पहाता येते. आक्रमकपणे वागणारे लोक म्हणजेच आतताई  लोकं परिणाम किंवा नातेसंबंधातील कत्तल याची पर्वा न करता जे काही त्यांना पाहिजे आहेत ते सांगतात.

त्यांना दुसऱ्या व्यक्तीची चिंता नसते तर फक्त त्यांचा स्वतःचा मार्ग मोकळा हवा असतो. धमकी देणारे लोक इतरांचे  लक्ष वेधण्यासाठी धमकी देणारी युक्ती वापरतात. या लोकांपैकी काहीजणांना याची जाणही नसते कि आपण इतरांशी कसे वागत आहोत. काही जणांच्या सवयीमुळे किंवा भूतकाळातील काही घटनांमुळे व्यक्ती आक्रमक वागतात.

भूतकाळात या व्यक्ती हिंसेची शिकार झालेल्या असू शकतात त्याचे पडसाद त्यांच्या वागण्यात दिसतात. याचा अर्थ त्या व्यक्तींनी आयुष्यभर इतरांशी तसेच वागावे असे होत नाही.

उलटपक्षी,

दृढनिश्चयी व्यक्ती इतर लोकांबाबत ते असे का वागत आहेत? असे  का करीत आहेत? हे जाणून घेण्यास आणि त्यांच्या आयुष्यातील इतर लोकांना कसे त्रास देत आहेत याचा पाठपुरावा करतात.

ते इतरांशी आपले संबंध टिकवण्यास मदत करतात. त्यांना खरोखर  इतरांची काळजी असते, आक्रमक लोकांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या व्यक्तींबरोबर दृधानिश्चयी व्यक्ती नेहमी खंबीरपणे व आत्मविश्वासाने सोबत असतात.  

दृढनिश्चयी व्यक्तींची कृती ही नेहमी वास्तविकता पाहण्याचा व पडताळण्याचा एकमात्र मार्ग असते. दृढनिश्चयी  व्यक्ती काळजीपूर्वक मार्गाने आक्रमक लोकांशी सत्य बोलणे ही एकमेव गोष्ट करतात. दृढनिश्चयी व्यक्ती धमकी देणाऱ्यांना जुमानत नाहीत. ते सामाजिक संस्थेला, नातेसंबंधांना आणि सर्वसाधारणपणे समाजाला योगदान देणारे असतात. समाजातील एक कार्यशील सदस्य होण्यासाठी सतत ते धडपडत असतात.

तथापि, काही लोकं सुप्त हेतूने आक्रमक असतात. ते इतरांवर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने धमकावतात आणि इतरांच्या शीर्षस्थानी उभे राहतात. असे वागल्यास त्यांच्या आजूबाजूचे लोकं आक्रमक लोकांना "वाईट" म्हणून वैशिष्ट्यीकृत करू लागतात. आपण या यादीत आपले नाव नक्कीच नेऊ इच्छित नसाल. 

उलटपक्षी,

दृढनिश्चयी व्यक्तीप्रमाणे वागणे अधिक गंभीर आणि चांगले व परिस्थितीला अनुसरून असते. त्याने आपण इतरांना स्वत:साठी उभे राहण्याची ताकद देतो. असे केल्याने दृढनिश्चयी व्यक्ती समोर आक्रमक व्यक्ती वर्चस्व दाखवण्यास नकार देते.

दृढनिश्चयी व्यक्ती ही इतरांना आपल्या सन्मानाचे व स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहण्यासाठी साधने देतात. दृढनिश्चयी व्यक्ती अश्या वेळेला आपली सचोटी राखते व इतरांना तसे करण्यास तयार व सहकार्य करते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel