डार्कनेट                                     

डार्कनेट यास डार्क वेब किंवा डार्क नेट देखील म्हटले जाते, हा अतिशय गुप्त आणि अधिक खोलात जाणारा नेटचा एक भाग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात इंटरनेटची अनेक वेगवेगळे उपयोग पहिले आहेत. नेटच्या वापराचे अनेक उपयोग ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. फेसबुकवर चित्र पोस्ट करणे आणि इंस्टाग्रामवर काही रील्स बनवून टाकणे याही व्यतिरिक्त वेगळे आणि रहस्यमयी काही करू इच्छित असणाऱ्या काही लोकांसाठी  डार्कनेट आहे.

डार्कनेट हे गुप्त वेबसाइटचे नेटवर्क आहे ज्यावर केवळ एका इनक्रिप्टेड म्हणजेच ज्याला सुरक्षित पासवर्ड असेल असे नेटवर्कवर प्रवेश केला जाऊ शकतो. आजकाल, हे अमलीपदार्थ म्हणजेच ज्याला ड्रग्स म्हणतात ते ऑनलाइन शोधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी स्त्रोत म्हणून वापरली जात आहे.

ब्रिक्स राष्ट्रांच्या वेबिनारवर झालेल्या परिषदेत डार्कनेटवरून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या गैरवापरांबद्दल आणि तस्करीबद्दल भारताने पुढाकार घेऊन चर्चा केली होती.

या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की,

“ब्रिक्स राज्यांमधील मादक पदार्थांच्या स्थितीविषयी, अंमलीपदार्थांची तस्करी, मनावर परिणाम करणार्‍या अमलीपदार्थांसंबंधी आणि त्यांचे पूर्वचिन्ह याबद्दल आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक काही घटक तसेच त्यांचे परिस्थितीवरील विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांचा शिखर परिषदेदरम्यान विचारविमर्श झाला"

याच निवेदनात पुढे असेही नमूद केले होते की,

“चर्चेदरम्यान उद्भवलेल्या सामान्य मुद्द्यांमध्ये सदस्य देशांमधील खरोखरची आणि साध्य परिस्थितीची माहिती एकत्रित करण्याची गरज

आणि सागरीमार्गांद्वारे होणाऱ्या मादक द्रव्यांच्या आणि अमलीपदार्थांच्या वाहतुकीला आळा घालण्याची गरज आहे.”

डार्कनेटचा वापर

अंमलीपदार्थ, बेकायदेशीर व्यापारांसाठी नेट कसे वापरले जात आहे?  हा एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो. डार्कनेट सुरक्षित पासवर्डने सुरक्षित असे कनेक्शनवर कार्य करते. ज्याचा अर्थ अतिशय खोलात जाऊन वेब वापरुन केले जाणारे बहुतेक व्यवहार अप्रतिबंधनीय असतात. आर्थिक गैरव्यवहारासाठी गुन्हेगार बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीचा फायदा घेऊ शकतात, जे पैसे कोठून पाठविले गेले आणि कोठून उद्भवले याचा कुठेही पत्ता लागत नाहीत. डार्क वेबचे काही मूलभूत ज्ञान वापरुन, कोणीही गुन्हेगार बनू शकतो. तथापि, अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी सायबर क्राइम विभागाकडे स्वतःची वेगळी रणनीती असते.

डार्कनेटची व्याख्या

डार्क वेब हे केवळ एका विशिष्ट वेब ब्राउझरद्वारे प्रवेश करण्यायोग्य इंटरनेट साइटचे छुपे समूह आहे. याचा वापर इंटरनेट वरचे काम अज्ञात आणि खाजगी ठेवण्याचा केला जातो, जे कायदेशीर आणि बेकायदेशीर अनुप्रयोगांसाठी उपयुक्त ठरू शकते. काहीजण सरकारी मुद्रणपर्यवेक्षकाचे काम टाळण्यासाठी याचा वापर करतात, परंतु त्याचा उपयोग अत्यंत बेकायदेशीर कृतींसाठीही केला जातो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel