प्रकरण ९

पाणिनी  ने दचकून उशी खाली फेकली. आर्या एकदम किंचाळायला लागणार तोच  पाणिनी  ने तिच्या तोंडावर हात ठेवला. “ओरडून उपयोग नाही.”  पाणिनी  म्हणाला   “ त्यापेक्षा शांत राहून आपण कुठल्या स्थितीत सापडलोय याचा अंदाज घ्यायला पाहिजे.” तो म्हणाला.

“ पण... पण....रक्त लागलंय त्याला.....” ती दबलेल्या आवाजात म्हणाली.

  पाणिनी  ने बाहेर पॅसेज  मधे डोकावून अंदाज घेतला. डॉक्टरांच्या खोलीपाशी आला आणि दार ठोठावले. आतून कडी काढल्याचा आवाज आला.दाढी करताना गालाला साबण लावलेल्या अवस्थेत  ते बाहेर आले. “  खाली नाश्त्याच्या वासानेच मी उठलो. तुम्ही आला नसतात तरी मी येणारच होतो.” खेर म्हणाले.

“ आम्ही त्यासाठी नाही वाजवले दार. तुम्ही तोंड धुवा आणि लगेच विहंग च्या खोलीत  या.”   पाणिनी  म्हणाला

 पाणिनी  त्यांना विहंग च्या खोलीत घेऊन गेला.डॉक्टरांनी उशी खाली ठेवलेली सुरी पाहिली.

“ मरुद्गण असणार हा. काल रात्री  विहंग मामा   झोपला तेव्हा त्याच्या मनात त्याचाच विचार असणार. त्यामुळे मामाने झोपेत ही सुरी घेऊन मरुद्गण च्या खोलीत प्रवेश केला नसेल ना....” आर्या ने शंका व्यक्त केली.

“ त्याच्या खोलीत जाऊन बघू ”   पाणिनी  म्हणाला

ते तिघे मरुद्गण च्या खोलीकडे निघाले.त्याचे दार ठोठावणार तोच आर्या म्हणाली, “ अरे, सॉरी , ही नाही खोली त्याची. म्हणजे आधी होती पण काल रात्री आयत्या वेळी त्याने आणि वदन राजे , म्हणजे विहंग मामाचा सावत्र भाऊ यांनी परस्परांच्या खोल्या बदलून घेतल्या.”

ती दुसऱ्या खोलीकडे वळली.हळुवार दार वाजवले.आतून काही प्रतिसाद आला नाही.तिने  पाणिनी  कडे पहात,दाराची मूठ फिरवण्यासाठी हात पुढे केला.

“ थांब जरा,मी पाहतो काय करायचं ते.”   पाणिनी  म्हणाला  आणि दार उघडले.आत कॉट वर कोणीतरी पडले होते,हालचाल न करता.  “ डॉक्टर कशालाही स्पर्श करू नका.”

आर्या  पाणिनी  च्या जवळ आली. आपल्या हाताने त्याचा दंड धरून थरथरत उभी राहिली.

 पाणिनी  ने कॉट वर पडलेल्या व्यक्ती चे  खाली वाकून निरीक्षण केले. तो मरुद्गण होता. पाणिनी  ने नाडी बघण्यासाठी त्याचा हात हातात घेतला, तोच तो उठून बसला.!

“ काय भानगड आहे ही? इथे का जमलाय तुम्ही सगळे?”

 “ आम्ही तुला नाश्त्याला बोलवायला आलोय.”

“ अरे ही काय पद्धत आहे? ” माझ्या खाजगी खोलीत कसे काय घुसता तुम्ही? मरुद्गण चिडून म्हणाला.  “ त्या हलकट विहंगने सांगितले असेल तुम्हाला माझे दस्त ऐवज चोरायला.तो स्वतःला मोठा उमद्या मनाचा आहे असे दाखवतो पण नालायक आहे.”

“ आणि मिसेस  वीरभद्र ना काय म्हणशील तू? त्याही नालायक आहेत का? ”  पाणिनी  म्हणाला .

मरुद्गण चा चेहेरा खर्रकन पडला.  “ अच्छा म्हणजे तुम्हाला माहिती झालंय तर तिच्या बद्दल.”

“ होय.”  पाणिनी  म्हणाला

“ म्हणून तुम्ही मला भेटायला आलात का? ”

“ उलट तुला नाश्त्याला बोलवायला आलोय.”

“ हे बघा तुम्हाला त्या बाई बद्दल ज्या ने काही सांगितलंय त्यावर विश्वास नका ठेऊ.नाण्याला दोन बाजू असतात.” मरुद्गण म्हणाला.

 पाणिनी  त्याला उत्तर देत बसला नाही. नाश्त्याला खाली घेऊन गेला.

“ ही वीरभद्र ची काय भानगड आहे? ” आर्या ने विचारले

“ त्याला नमवण्याचे एक हत्यार आहे.”  पाणिनी  म्हणाला   “ आता तो पाळीव कुत्रासारखा  माझं ऐकेल.”

“ पण त्याचा विहंग मामा वर.....” ती म्हणाली.

“ ते जाऊदे, अत्ता आपण इथली माणसांची संख्या मोजून घेऊ.”

“ म्हणजे?” आर्या ने शंका व्यक्त केली.

“ म्हणजे इथून अजून कोणी निघून गेलं नाही ना ते तपासू.”   पाणिनी  म्हणाला   “ इथे कोण राहते ? ” एका दाराकडे निर्देश करत  पाणिनी  ने विचारले.

“ दुर्वास. ती म्हणाली ”

 पाणिनी  ने दारावर टकटक केली.

“ कोण आहे ? ” आतून आवाज आला.

 पाणिनी  डॉक्टर खेर  कडे  बघून हसून म्हणाला, “ कायदा शिकल्याचा रुबाब बघा ! मी तुमचे दार वाजवले तेव्हा तुम्ही ते उघडले, आणि या अॅडव्होकेट दुर्वास चे दार वाजवले तर आतून खेकसल्या सारखे विचारतोय, कोण आहे म्हणून.”

“ कदाचित तो बाहेर येण्या च्या अवस्थेत नसेल.” डॉक्टर म्हणाले.

तेवढ्यात दुर्वास पूर्ण अद्ययावत पोशाखात, सुटा बुटात बाहेर आला .

“ काय हवंय तुम्हाला.? ” त्याने विचारले.

“ नाश्त्या साठी निमंत्रण ! ”  पाणिनी  म्हणाला

“ डॉक्टर खेर ने हा काय नवीन डाव टाकलाय का?  ” त्याने कडवट पणे विचारले.

“ तसं समजा हवं तर  ”   पाणिनी  म्हणाला  आणि दारा पसून दूर झाला. आर्या ही लांब जाऊन पुढच्या दारापुढे उभी राहिली. ती ज्या दारासमोर होती त्याकडे निर्देश करून दुर्वास ने विचारलं, “ या खोलीत वदन, म्हणजे विहंग चा सावत्र भाऊ झोपायचा का? ”

“ हो. काल रात्री पर्यंत मरुद्गण झोपायचा,  नंतर मरुद्गण आणि त्याने बदलून घेतल्या ” आर्या म्हणाली

“ ठीक आहे, वदन ला बोलावू या.” दुर्वास म्हणाला. आणि त्याने दार वाजवले. आतून उत्तर आले नाही.

 पाणिनी  पण गोंधळून गेला.त्याने ही जोरात दार वाजवले. आतून उत्तर आले नाही.त्याने दाराची मूठ फिरवली.दार उघडले.आत नजर टाकली.दारात उभा राहून इतरांची वाट अडवून तो उभा राहिला.

“ त्या मुलीला बाजूला न्या डॉक्टर.”  पाणिनी  म्हणाला

मरुद्गण पायजमा आणि स्लीपर घालून तिथे आला, तो ही दारातून डोकाऊन बघू लागला.

“ का ? काय झालं? ”दुर्वास पुढे घुसायचा प्रयत्न करत म्हणाला.  “ मला समजलं पाहिजे ,काय भानगड आहे ही.”

“ आर्या बाहेर ये आधी ” डॉक्टर ओरडले. आर्या रुमालाला डोळे पुसत बाहेर पडली.

“मरुद्गण, तू  बघितलं आहेस.त्यानी काय केलंय ते. या सगळ्याच्या मुळाशी जायचंय मला. ” दुर्वास म्हणाला.

 पाणिनी  ने त्याच्या पेक्षा आवाज वाढवून डॉक्टरांना हाक मारली, “ डॉक्टर ताबडतोब आत या.मला इथे तुमची गरज आहे.आणि दोन साक्षीदार सुध्दा हवे आहेत मला.या दोघांनी इतरांना या प्रकरणात अडकवू नये म्हणून. ”

“ माझ्या अशिलाच्या वतीने मी धिक्कार करतो पटवर्धन च्या या आरोपाचा.  अरे बापरे ! याचा खून झालाय.” दुर्वास उद्गारला.

डॉक्टर खेर नी कॉट जवळ येऊन  रक्ताच्या डागाकडे नजर टाकली.अर्धवट उघड्या असलेल्या डोळ्याकडे पाहिलं.आपल्या हात गळ्याला लावला.  “ पटवर्धन, हे पोलिसांचंच काम आहे.”

“ सर्वांनी तातडीने खोलीच्या बाहेर जा. कशालाही हात लावू नका. इथे पोलिसांना बोलावून घेणार आहे मी.”  पाणिनी  पटवर्धन जोरात ओरडून म्हणाला.

“ हे तुम्हाला स्वतःला सुद्धा लागू होतं.” दुर्वास म्हणाला.

“ अर्थातच.”   पाणिनी  म्हणाला

“ तर मग स्वतः आधी बाहेर जा. आम्हाला एखाद्या कुत्राला हाकलून दिल्या प्रमाणे वागणूक देऊ नका.” दुर्वास म्हणाला.  “ मला समजत नाही आम्हा सगळ्यांना आज्ञा देण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? सगळ्या परिस्थितीचा ताबा तुम्ही स्वत:च का घेताय?”

“ मी सगळ्यांना उद्देशूनच सूचना दिली आहे. तुम्हाला बाहेर जायचं नसेल तर थांबा आतच. मी पोलीस आले की त्यांना सांगीन की तुम्ही आतच थांबला होतात म्हणून, तुमच्या जबाबदारीवर. . ”   पाणिनी  म्हणाला

दुर्वास ने मरुद्गण चा हात हातात धरला. “ तातडीने बाहेर जावूया  पटवर्धन आपल्याला अडकवायला बघतो आहे या खुनात.”

“ कोणाचा तरी खून झालाय हे त्यांना माहीत होत, त्यांना वाटत होत की माझाच खून झालाय.” मरुद्गण म्हणाला.

“ बाहेर हो आधी. मला कही गोष्टी माहिती आहेत पण मी त्या पोलिसांनाच सांगणार आहे.” दुर्वास  म्हणाला.  “ मी म्हणतो की तातडीने पोलिसांना बोलवा.”

“ तू माझ्या पेक्षा वेगळ काही म्हणत नाहीयेस.”   पाणिनी  म्हणाला  आणि फोन हातात घेऊन म्हणाला, “ पोलीस चौकी? इथे विहंग खोपकर नावाच्या माणसाचा घरात एक खून झालाय.” पोलिसांना घराचा पत्ता देऊन तो म्हणाला, “ तुम्ही आलात की मी सविस्तर बोलीन. मी आता खोली बंद करून घेतोय आणि शक्य झाल्यास, म्हणजे खोलीची किल्ली मिळाली तर कुलूप लाऊन घेतोय.”

“ तुझं अशील विहंग च्या मनात खून करायचा विचार घोळत असेल आधी पासूनच, तर त्यासाठी त्याने अत्यंत चतुराई ने वातावरण निर्माण केलं आहे .” सगळे बाहेर पडल्यावर कोणी जवळपास नाही याची खात्री करून  डॉक्टर  पाणिनी  ला म्हणाले.

“ कशावरून ? ”   पाणिनी  म्हणाला .

“ हाताला कंप सुटल्याचा त्याने केलेला अभिनय.” डॉक्टर म्हणाले.

“ हे पहा डॉक्टर, ”  पाणिनी  म्हणाला,  “ तुम्हाला तुमच्या सकाळच्या अपॉइंटमेंट चुकवायच्या नसतील तर तुम्ही जाऊ शकता. इथे तुमची गरज नाही. माझी गाडी घेऊन जा हवं तर.”

( प्रकरण ९ समाप्त)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel