देह कुठे असतो असा याचा अर्थ अर्थातच नाही .मानसिक दृष्ट्या आपण कुठे असतो म्हणजे मन कुठे असते असा याचा अर्थ आहे .जरा अंतर्मुख होऊन विचार करा .मनात येणाऱया विचारांचे  स्वरूप कसे असते?.लहानपणापासून ज्या काही लहान मोठ्या घटना घडलेल्या असतील त्यांची आपल्या मनात नोंद केलेली असते .आई वडील भाऊ बहीण इतर नातेवाईक शेजारी मित्र शाळा कॉलेज इत्यादी बद्दल कटू गोड आठवणी मनात असतात .ज्याच्या त्याच्या  लक्षात ठेवण्याच्या कुवतीनुसार प्रत्येकाच्या मनात त्याचा साठा असतो लक्षात ठेवण्याच्या कुवतीनुसार कमी जास्त प्रमाणात त्यांची मनात गर्दी झालेली असते  विचार करताना मन भूतकाळात असते आणि या सर्व आठवणी  मनातल्या मनात किंवा  दुसऱ्यांना सांगण्याच्या स्वरूपात बाहेर  पडतात. 
या भूतकाळातील आठवणींच्या आधारावर आपले मन भविष्य काळात जात असते.भूतकाळाच्या आधारावर भविष्य काळात आपण काय काय करू याचा आराखडा काढला जातो.इतर आठवणीं बरोबर आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक इत्यादी आठवणींचाही यामध्ये अंतर्भाव असतो.त्यामुळे भविष्यकाळातील रेखाटनेही त्याच प्रकारची असतात भूतकाळाच्या पायावर भविष्यकाळाचे इमले रचले जातात भविष्यकाळात जाण्यासाठी भूतकाळा शिवाय आपल्या जवळ दुसरे काही साधन नाही व भूतकाळ म्हणजेच आपली धारणा होय जी प्रत्येकाची वेगवेगळी असते .भूतकाळातून  भविष्यकाळात व भविष्यकाळातून भूतकाळात अशी मनाची ये जा चालू असते .
परंतु या गडबडीत आपण जिथे असतो म्हणजेच वर्तमान काळ हा विसरला जातो .वर्तमान म्हणून काही असते का? जो क्षण येणारा असतो तो भविष्यातील असतो व गेलेला क्षण भूतकाळात जमा झालेला असतो मग वर्तमानातील  क्कोणता?तो असतो का? तो चिमटीत पकडता येईल का ?आला तर तो कसा असेल ?त्याचे वर्णन करता येईल का? की ज्याला तो पकडता आला तो त्याचा वैयक्तिक अनुभव असेल .त्याचे वर्णन कोणाला करता येईल का ? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत .ज्यांना याचे उत्तर सापडले ते त्याचे वर्णन करू शकत नाहीत.त्यांनी केले तर अापण आपल्या धारणेनुसार त्याचा अर्थ लावतो व प्रत्येकचा अर्थ वेगवेगळा असतो .ज्यांच्यावर आपला विश्वास आहे व ज्यांना आपण मानतो त्यांचे म्हणणे ही अनुभवाची गोष्ट आहे .
थोडक्यात अापण भूतकाळ भूतकाळावर आधारित भविष्य काळामध्ये असतो व जेथे म्हणजे वर्तमान काळात असले पाहिजे  तिथे अभावानेच असतो.पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो ही सर्व चर्चा मानसिक स्थितीबद्दल आहे   

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel