गुरू म्हटल्यावर आपल्याला शैक्षणिक  आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक इत्यादी गुरू डोळ्यासमोर उभे रहातात.मला इथे धार्मिक म्हणजेच अध्यात्मिक गुरू अभिप्रेत आहे .

गुरू आपल्याला का हवासा वाटतो याचा विचार करणे जरूर आहे.समाधानाचा शोध ही मनुष्याची स्वाभाविक मूळ प्रवृत्ती आहे .संपत्ती वैभव सत्ता अधिकार इत्यादी मार्गांनी मनुष्य समाधान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो .हळूहळू त्याच्या असे लक्षात येते की यातील काहीही आणि कितीही मिळाले समाज मान्यता मिळाली तरीही आतून  असमाधान आहे .अशा वेळी तो जपजाप्य  तीर्थाटन भजन पूजन इत्यादी मार्ग अवलंबित असतो.यातूनही समाधान मिळत नाही ,असे आढळल्यावर, तो आपल्याला एखादा गुरू, अनुग्रह करून,
शांती समाधान मिळवून देईल, असे वाटत असल्यामुळे, त्याचा आसरा घेतो . हा गुरू निवडताना आपले पूर्वग्रह, मनोरचना, म्हणजेच धारणा, यावर  योग्य व अयोग्य गुरू ठरविला जातो.गुरू कसा आहे हे आपणच ठरवतो म्हणजेच त्यांची योग्यता अयोग्यता आपण ठरवितो .तो आपल्याला समाधान मिळवून देईल हे आपणच ठरवितो .कदाचित समाधान मिळेलही . सर्व आपणच ठरवीत असतो. हे समाधान  टिकावू न वाटल्यास आपण पुन्हा दुसऱ्या गुरूच्या शोधाला लागतो. 
      असे समाधान मिळवू नये असे मी म्हणत नाही किंवा मिळवावे असेही म्हणत नाही .फक्त समाधान असमाधान आपणच निर्माण करतो आणि उगीचच भटकत असतो .दुसरा कुणी आपल्याला समाधान कसे काय देऊ शकतो .ही सर्व प्रक्रिया समजली तर योग्य गुरू ,अयोग्य गुरू, गुरू असावा की नसावा ,तो आपल्याला समाधान देऊ शकेल की नाही हे ज्याचे त्याला उमजेल 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel