जसुमतीराजा यदुवंशी त्याचे कूळ.उपनाम तोवर. गर्गायनऋषि गोत्र. कुळदैवत जोगेश्वरी. तक्तगादी- कर्नाटक (सावनूर-बंकापूर), हिरवी गादी, हिचे निशाण, पिवळा वारू, जरी पटका, भूचरी मुद्रा. नरसिंह मंत्र, विवाह(लग्न) कार्यास देवक उंबराचे व सोन्याची माळ किंवा रुद्राक्षांची माळ अथवा कांद्यांची माळ.विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र पूजणे त्यागा. यांची कुळे येणेप्रमाणे:-तोवर, तामटे, बुलके, धावडे, मालयवार, ही कुळे मिळून तोवर जाणावे.क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवे) घालणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे असे तोवर जाणावे.
- स्वैर अन्वय
तोवर कुलाचा पाया यादुवंशीय राजा जसुमती याने रोवला आहे. या कुळाचे गोत्र गर्गायन आहे. यांचे कुलदैवत जोगेश्वरी देवी आहे. या कुळाची गादी(सत्ता) कर्नाटक राज्यातील सावनुर ते बंकापूरची आहे. त्यांचा झेंडा व सिंहासनाची गादी हिरव्या रंगाचे आहे. त्यांच्या झेंड्यावर भूचरी मुद्रा असलेला घोडा असून त्या झेंड्याला जरीची किनार आहे. लग्नाकार्याच्या वेळी तोवर कुळाचे उंबर आणि सोन्याची, कांद्याची किंवा रुद्राक्षांची माळ देवक म्हणून पूजतात. तोवर कुळामध्ये तामटे, बुलके, धावडे, मालयवर ही कुळे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.