यदुराजा यदुवंशी त्याचे कूळ, उपनाम जाधव ऊर्फ यादव. कौडिन्यऋषि गोत्र, कुळदैवत जोगेश्वरी, जोतीबा आणि खंडेराव. तक्तगादी मथुरापूर. पिवळी गादी, पिवळे निशाण, पिवळा वारू, अलक्षमुद्रा, पंचाक्षरी मंत्र, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचे, आंब्याचे व उंबराचें. विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र पूजणें तरवार. यांची कुळे येणेप्रमाणेः-जाधव, जालिंदरे, जसवंत, जगपाल, पाटेल, जागले, जारे, घुमक, घोगले, सीरगोरे, यादव, घरत ही कुळे मिळून जाधव जाणावे. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे, ऐसे जाधव जाणावे.
- स्वैर अन्वय
जाधव उर्फ यादव हे यदुवंशी राजा यदुराज याचे कुळ आहे. यांचे गोत्र कौडीन्य(कौंडील्य) आहे. यांचे कुलदैवत जोगेश्वरी देवी आणि पालचा खंडोबा(खंडेराया/खंडेराय) हे आहे. या कुळाची गाडी(सत्ता) मथूरेतून उगमाला आली. यांच्या सिंहासनाची गादी पिवळ्या रंगाची आहे. यांचा झेंडा पिवळ्या रंगाचा आहे त्यावर अलक्षमुद्रा असलेला पिवळा घोडा आहे. यांचा यल्गार(एल्गार) मंत्र पंचाक्षरी आहे. विवाह(लग्न) कार्यात जाधव कुळाचे लोकं उंबरचे, आंब्याचे किंवा कळंबाच्या झाडे किंवा फांदीचे पूजन करतात. विजयादशमीला या कुळाच्या लोकांनी तलवारीचे पूजन करावे. जाधव उर्फ यादव कुळामध्ये जालिंदरे, जसवंत(यशवंत), जगपाल(जगपाळ), पाटेल(पाटील/पटेल), जागले, जारे, घुमक, घोगले, सिरगोरे, यादव, घरात ही कुळे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे हे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे.