गोप्तीराजा शेषवंशी त्याचे कूळ, उपनाम बागवे, शौनल्य ऋषि गोत्र कुळदैवत महाकाळी, भूचरी मुद्रा, नरसिंहमंत्र, तक्तगादी कोटबुंधी, भगवी गादी, भगवे, निशाण, भगवा वारू, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचे, विजयादशमीस (दुस- यास) शस्त्र पूजणेतरवार. यांची कुळे येणेप्रमाणे:- बागवे, परख, मोकाशी, दिवटे, हीं. कुळे मिळून बागवे. क्षत्रिय धर्म चालविणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे असे बागवे जाणावे.
- स्वैर अन्वय
शेष(नाग)वंशीय राजा गोप्तीराजा याने बागवे कुळाचा पाया रोवला आहे. यांचे गोत्र शौनल्य(शौन) आहे. यांचे कुलदैवत महाकाली आहे. या कुळाची गादी(सत्ता) तेंव्हाचे कोटबुंधी म्हणजेच आत्ताचे धरणगारी म्हणजेच मध्यप्रदेध मधील गार ठिकाण येथील आहे. यांच्या सिंहासनाच्या गादीचा रंग भगवा आहे. त्यांच्या झेंड्याचा रंग भगवा असून त्यावर भूचरी मुद्रेचा भगवा घोडा आहे. यांचा यल्गार(एल्गार) नरसिंहमंत्र आहे. विवाह(लग्न) कार्यात बागवे कुळाचे लोकं कळंबाचे झाड किंवा फांदी देवक म्हणून पूजतात. विजयादशमीला तलवार हे शस्त्र पूजावे. बागवे कुळामध्ये परख(पारेख), मोकाशी, दिवटे ही कुले येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.