कर्णध्वजराजा यदुवंशी त्याचे कूळ, उपनाम शिरके, सौनल्यऋषि गोत्र. कुळदैवत महाकाळी, तक्तगादी अमदाबाद, शुभ्र गादी, शुभ्र निशाण, शुभ वारू, जरीपटका, चाचरी मुद्रा, बीजमंत्र, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचे, विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र पूजणे खांडा. यांची कुळे येणेप्रमाणेः-शिरके, फांकडे, शेलके, बागवान, गावंड, मोकल. ही कुळे मिळून शिरके जाणावे. क्षत्रियधर्म चालविणे, सोवळे धूत वस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे, ऐसे शिरके जाणावे.
- स्वैर अन्वय
यदुवंशीय राजा कर्णध्वज याने शिर्के/शिरके यांचा पाया रोवला आहे. या कुळाचे गोत्र सौनल्य(शांडिल्य) आहे. या कुळाचे कुलदैवत कालीमाता आहे. शिर्केंची गादी(सत्ता) अहमदाबाद, गुजरात.ची आहे. सिंहासनाच्या गादीचा रंग शुभ्र(पांढरा) आहे. या कुळाचा झेंडा शुभ्र(पांढरा) रंगाचा असून त्यावर चाचरी मुद्रेतला शुभ्र घोडा आहे शिवाय त्यांच्या झेंड्याला जरीची किनार आहे. या कुळाचा यल्गार(एल्गार) बीजमंत्राचा आहे. विवाह(लग्न) कार्याला या कुळात कळंब झाडाची किंवा फांदीची पूजा करावी. या कुळाच्या लोकांनी विजयादशमीला खंडा या शास्त्राची पूजा करावी. शिरके/शिर्के या कुळामध्ये शिरके, फांकडे(फाकडे), शेलके(शेळके), बागवान, गावंड(गावंडे), मोकल(मोकळ) यांचा समावेश होतो. यांचे कार्य आपला क्षत्रिय धर्म पाळवे. यांनी सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.याचे कार्य आपला क्षत्रिय धर्म पाळणे हे आहे. यांनी सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.