सुमंती राजा शेषवंशी त्याचे कूळ, उपानाम ह्माडिक, माल्यवंत ऋषि गोत्र, कुळदैवत कात्यायनी, खेचरी मुद्रा, पंचाक्षरी मंत्र, तक्तगादी बागलकोट, निळी गादी, निळे नि- शाण, निळा वारू, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचें अथवा पिंपळाचे. विजयादशमीस (दसचास ) शस्त्र कटवार किंवा तरवार पूजणे. यांची कुळे येणेप्रमाणेः-
ह्माडिक, गवळी, भोगले, भोइर, ठाकूर ही कुठे मिळोन ह्माडिक. क्षत्रियधर्म चालवणे. सोवळें शुभ्र वस्त्र परिधान करणे, यज्ञोपवीत घालणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे,असे झाडीक जाणावे.

  • स्वैर अन्वय

 शेष(नाग)वंशीय राजा सुमंती याने ह्माडिक/महाडिक या कुळाचा पाया रचला आहे. ह्माडिक/महाडिक कुळाचे गोत्र माल्यवंत आहे. ह्माडिक/महाडिक कुळाची कुलदेवी कात्यायनी म्हणजेच सिंहारूढ महिषासुरमर्दिनी आहे. ह्माडिक/महाडिक यांची गादी(सत्ता) बागलकोट, कर्नाटक येथे आहे. यांच्या सिंहासानाच्या गादीचा रंग नीळा आहे. त्यांच्या झेंड्याचा रंग निळा असून त्यावर खेचरी मुद्रा असलेल्या घोड्याचे चित्र आहे. ह्माडिक/महाडिक या कुळाचा यल्गार(एल्गार) पंचाक्षरी मंत्र आहे. विवाह(लग्न)कार्याला ह्माडिक/महाडिक कुळाचे कळंबाचे किंवा पिंपळाचे झाड किंवा फांदीचे पूजन करतात. विजयादशमीला या कुळाने तलवार आणि कट्यारीची पूजा करावी. ह्माडिक/महाडिक या कुळात महाडिक, गवळी, ठाकूर(टागोर), भोगले, भोईर हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे शुभ्र(पांढरे) कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.    

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel