सिंहकेत राजा सूर्यवंशी त्याचे कूळ, उपनाम सिसोदे, गौतम ऋषि गोत्र, कुळदैवत श्री अंबिका देवी, भूचरी मुद्रा, पंचाक्षरी मंत्र, विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र पूजणे कट्यार, लग्नकार्यास देवक हळदीचे आणि कळंबाचे, तक्त गादी तुळजापूर. यांची कुळे येणेप्रमाणे:-सिसोदे, आपराधे, भोवर, जोशी आणि सालव, ही चार कुळे मिळून सिसोदे. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे.ऐसे सिसोदे जाणावे.
- स्वैर अन्वय
सिसोदे कुळाचा पाया सूर्यवंशीय राजा सिंहकेत याने रोवला आहे. सिसोदे कुळाचे गोत्र गौताम आहे. या कुळाचे कुलदैवत अंबिका(अंबामाता/अंबाबाई) देवी आहे. सिसोदे कुळाची गादी(सत्ता) तुळजापूरची आहे. सिसोदे कुळाच्या झेंड्यावर भूचरी मुद्रा असलेला घोडा आहे. सिसोदे कुळाचा यल्गार(एल्गार) पंचाक्षरी मंत्र आहे. विवाह(लग्न)कार्यात हळदीचे आणि कळंबाचे झाड किंवा पान/फांदी देवक पूजले जाते. सिसोदे कुळात आपराधे, भोवर(भोवळ/भोवल), जोशी(दोशी), सालव(साळव/साळवी) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.