हंसध्वज राजा सूर्यवंशी त्याचे कुळ. उपनाम साळुंके/साळुंखे विश्वामित्र ऋषि, काश्यप गो- त्र, कुळदैवत हिंगलाज माता, अगोचरी मुद्रा, बीजमंत्र, लमकार्यास देवक कमळ देंटा- सहित, किंवा साळुकीचें पीस, तक्त गादी दिल्ली शहर, पिवळी गादी, पिवळे निशाण, जरदा वारू, विजयादशमीस (दसन्यास) शस्त्र पूजणे खांडा. यांची कुळे येणे प्रमाणे:- साळुंके/साळुंखे १, वाघमारे २, घाटगे ३ घाग ४, पाताडे किंवा पटोले ५. ही पांच कुळे मिळून साळुंके/साळुंखे जाणावे. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र परिधान करणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गो० अती० पुरा० करणे, असे साळुंके/साळुंखे जाणावे.
- स्वैर अन्वय
साळुंके/साळुंखे कुळाचा पाया सुर्यावंशीय राजा हंसध्वज याने रोवला आहे. साळुंके/साळुंखे कुळाचे गोत्र विश्वामित्र/भारद्वाज, कश्यप आहेत. या कुळाचे कुलदैवत हिंगलाज माता, बलुचिस्तान, पाकिस्तान, आहे. साळुंके/साळुंखे कुळाची गादी(सत्ता) दिल्लीची आहे. या कुळाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग पिवळा आहे. या कुलाच्या झेंड्याचा रंग पिवळा (कपिध्वज) आहे. त्यावर अगोचरी मुद्रा असलेला जरदा घोडा आहे. विजयादशमीला या कुळाने खंडा हे शस्त्र पुअज्वे. साळुंके/साळुंखे कुळात वाघमारे, घाटगे(घाडगे) घाग, पाताडे(पाटाडे), पाटोले(पाटोळे) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. जानवे घालावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.