सुधन्वा नामक राजा सूर्यवंशी त्याचे कुळ. उपनाम राणे, जामदग्नि ऋषि गोत्र, कुळदैवत माहेश्वरी, चाचरी मुद्रा, षडक्षरी मंत्र, विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र त- खार पूजणे, तक्त गादी उदेपूर, लाल गादी, लाल निशाण, अबलकवारू, लग्नकार्यास देवक सूर्यकांतीचे अथवा वडाचे. यांची कुळे:-राणे १, दुधे २, सीगवन ३, मुलीक ४ आणि पाटक ५. ही पांच कुळे मिळून राणे जाणावे. क्षत्रिय धर्म चालवणे, सोंवळे धूत वस्त्र परिधान करणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणें ऐसे राणे जाणावे.
- स्वैर अन्वय
राणे कुळाचा पाया सूर्यवंशीय राजा सुधन्वा याने रोवला आहे. या कुळाचे गोत्र जमदग्नी आहे. राणे कुळाचे कुलदैवत माहेश्वरी देवी आहे. राणे कुळाची गादी(सत्ता) उदयपुरची आहे. या कुलाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग लाल आहे. या कुलाच्या झेंड्याचा रंग लाल असून त्यावर चाचरी मुद्रा असलेला अबलक घोडा आहे. राणे कुळाचा यल्गार(एल्गार) षडाक्षरी मंत्र आहे. विजयादशमीला या कुळाने तलवार या शस्त्राचे पूजन करावे. विवाह(लग्न) कार्यात राणे कुळाचे लोकं सूर्यफुलाचे किंवा वादाच्या झाडाचे किंवा फांदीचे देवक म्हणून पूजा करतात. राणे या कुळात दुधे, सीगवान(शिगवण/शिगवन/शिगवान), मुलीक(मुळीक), पाटक(पाठक) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. जानवे घालावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.