हरिश्चंद्र राजा सूर्यवंशी त्याचे कुळ. उपनाम घोरपडे, वसिष्ठ ऋषि गोत्र, कुळदैवत खंडे- राव, अगोचरी मुद्रा, पंचाक्षरीमंत्र, विजयादशमीस कट्यार पुजणे. लग्नकार्यास देवक रुईचे, तक्तगादी पैठण, शुभ्र गादी, शुभ निशाण, लाल अथवा निळा घोडा. यांची कुळे:-घोरपडे, मालप, पारधे आणि नलावडे. ही चार कुळे मिळून घोरपडे. क्षत्रिय धर्म चालवणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, सोवळे धूत वस्त्र नेसणे, गोग्रास देणे कथा पुराण श्रवण करणे, ऐसे हे घोरपडे जाणावे.
- स्वैर अन्वय
घोरपडे कुळाचा पाया सूर्यवंशीय राजा सत्यवादी हरिश्चंद्र याने रोवला आहे. या कुळाचे गोत्र वशिष्ठ आहे. या कुळाचे कुलदैवत खंडेराव(खंडोबा/खंडेराया/खंडेराय) आहे. घोरपडे कुळाची गादी(सत्ता) पैठण आहे. या कुळाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग शुभ्र(पांढरा) आहे. या कुळाच्या झेंड्याचा रंग शुभ्र(पांढरा) असून त्यावर अगोचरी मुद्रा असलेला लाल किंवा निळा घोडा आहे. विवाह(लग्न) कार्यात घोरपाडे कुळात रुईचे झाड किंवा फांदी देवक म्हणून पूजतात. विजयादशमीला या कुळाच्या लोकांनी कट्यार पुजावी. घोरपडे यांमध्ये मालप(मालक), पारधे(पारधी), नलावडे हे पाहेत. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.