भोज राजा सूर्यवंशी त्याचे कुळ, उपनाम भोसले, शालंकायन ऋषि गोत्र, कुळदैवत जगदंबा, भूचरी मुद्रा, तारक मंत्र, विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र विचवा पूजणे, लग्नकार्यास देवक शंख पूजणे, भगवी गादी, भगवे निशाण, निळा वारू, तक्त गादी नागपूर. यांची कुळे:- भोसले १ सकपाळ २ राव ३ नकासे ४. ही चार कुळे मिळून भोसले. क्षत्रिय धर्म चालवणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे,गो- ग्रास देणे, अतीतअभ्यागत पाळणे, शास्त्र पुराण श्रवण करणे. ऐसे हे भोसले जाणावे.
- स्वैर अन्वय
भोसले कुळाचा पाया सूर्यवंशीय राजा भोज याने रोवला आहे. या कुळाचे गोत्र शालंकायन(कौशिक). भोसले कुळाचे कुलदैवत जगदंबा आहे. भोसले या कुळाची गादी(सत्ता) नागपूरची आहे. या कुळाच्या सिंहासानाच्या गादीचा रंग भगवा आहे. या कुळाचा झेंडा भगवा असून त्यावर निळा भूचरी मुद्रा असलेला घोडा आहे. विजयादशमीलं या कुळाने बिछवा हत्याराचे पूजन करावे. विवाह(लग्न) कार्यात भोसले कुळाने शंखाचे देवक म्हणून पूजन करावे. भोसले कुळात सकपाळ(संकपाळ/सपकाळ), राव, नकासे(नखाते) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी. तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.