अजपाळ राजा सूर्यवंशी त्याचे वंशी झाले. उपनाम सुर्वे, वासिष्ठ गोत्र, कुळ- दैवत महालक्ष्मी देवी, खेचरी मुद्रा, तारकमंत्र विजयादशमीस (दुसन्यास) शस्त्र खांडा पूजणे, लग्नकर्यास देवक (कळंबाचे अथवा सूर्यफूल), तक्त गादी अयोध्यापट्टण, पिवळी गादी, पिवळे निशाण, तावडा घोडा. यांची कुळें:-सितोले १, गवसे २, नाइक ३, घाड ४, राऊत ५, आणि सुर्वे ६. ही साहा कुळे मिळून सुर्वे, क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, शास्त्र पुराण ऐकणे, गोग्रास देणे, ऐसें सुर्वे कुळ जाणावें.
- स्वैर अन्वय
सूर्यवंशीय राजा आजपाळ याने सुर्वे कुळाचा पाया रोवला. या कुळाचे गोत्र वशिष्ठ आहे. सुर्वे कुळाचे कुलदैवत महालक्ष्मी देवी आहे. या कुळाची गादी(सत्ता) अयोध्येची आहे. विजयादशमीला या कुळाने खंडां हे शस्त्र पूजने. या कुळाची सिंहासनाच्या गादीचा रंग पिवळा आहे. या कुळाचा झेंडा पिवळा असून त्यावर खेचरी मुद्रेचा तांबडा(लाल) घोडा आहे. या कुळात सितोले(शितोळे), गवसे, नाईक(नायक), घाड, राऊत येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी. तिला अन्न-पाणी द्यावे.