"राजा पोरस!" चेतक आणि मी त्याच्या दिशेने धावत गेलो. मलयकेतु सुद्धा आमच्या सोबत तिथे पोहचला.
मी चेतकच्या पाठीवरून उडी मारली आणि राजाच्या बाजूला गुडघे टेकले आणि बसलो.
“ते जिवंत आहेत” मी मलयकेतुला म्हणालो "आपण त्यांना वाचवायला हवे." मलयकेतु भीतीने थरथरत होता.
आम्ही राजा पोरसला चेतकच्या पाठीवर बसवले आणि नंतर त्याला रणांगणापासून दूर नेले. इतक्यात बातमी कानावर आली अलेक्झांडरचे सैन्य झेलम नदी ओलांडत आहे.
"त्यांनी आमच्यावर विजय मिळवला!" मलयकेतु रडत रडत बोलला.
"यापुढे तू राजकुमार राहणार नाहीस." मी म्हणालो.
“पाणी..” इतक्यात पोरसने पाणी मागितले. मी जखमी पोरसला पाणी पाजण्यासाठी वाकलो..
"त्यांनी आमच्यावर विजय मिळवला का?" राजाने धुसफुसत विचारले.
"होय, आम्ही जिंकलो आहोत." माझ्या मागून कोणाचातरी आवाज आला.
जेव्हा मी वळलो, तेव्हा अलेक्झांडर द ग्रेटचा चेहरा पाहून मी चकित झालो. मलयकेतु भीतीने किंचाळला आणि त्याने स्वतःला ढालीने झाकून घेतले. पण मी तसाच उभा राहिलो.
"तुम्ही राजकुमार आहात का?" अलेक्झांडरने विचारले.
"होय, मी राजकुमार आहे." मी म्हणालो. "आणि हा राजा पोरस आहे."
अलेक्झांडरने पोरसला त्याच्या पायाच्या बोटाने स्पर्श केला.
“राजा पोरस, आम्ही तुला पराभूत केले आहे. आता आम्ही तुझ्याशी कसे वागू?"
पोरस निर्बल झाला होता पण तो उठला आणि बसला. "जसा एक राजा दुसऱ्या राजाशी वागायला हवा."
अलेक्झांडर हसला. "मला तुझे उत्तर आवडले. हे राज्य आता माझे आहे. पण तूच त्याचा शासक राहशील."
माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी थोडा निराश झालो कारण मलयकेतुने अलेक्झांडरचा गुलाम व्हावे अशी माझी इच्छा होती.
अलेक्झांडर ने उसासा टाकला. "आजचा दिवस खूप वाईट होता. माझा घोडा या भयंकर लढाईत मारला गेला."
चेतक फुरफुरला आणि त्याने डोके खाली केले. "मला दुसरा घोडा हवा आहे," सिकंदरने आपले बोलणे चालू ठेवले. "जो शूर असेल आणि मला युद्धात घेऊन जाऊ शकतो."
चेतक हळूच फुरफुरला. मी त्याचे नाक कुरवाळले. मला माहित होते की मी काय केले पाहिजे.
"हा घोडा खूप मजबूत आणि शूर आहे. त्याचे नाव चेतक आहे." मी अलेक्झांडरला सांगितले. मग मी एक दीर्घ श्वास घेतला. "आता तो घोडा तुमचा आहे."
अलेक्झांडर म्हणाला "वाह चेतक! चेतक आणि मी मिळून हे जग जिंकू!"
चेतकने माझ्या खांद्यावर त्याचे नाक घासले. तो सिकंदर सोबत जाणार म्हणून खुश होता. चेतकने फुरफुरून या करारास सहमती दर्शविली.
"तू एक चांगला राजकुमार आहेस," सिकंदर मला म्हणाला आणि मग तो चेतकवर चढला आणि टाच मारून पुढे निघाला.
मलयकेतु त्याच्या ढाली खाली लपून रडू लागला.
अलेक्झांडर जग जिंकू शकला नाही. तो भारतावर विजयही मिळवू शकला नाही. एका वर्षानंतर तो आपला देश सोडून गेला.
कदाचित तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण होईल पण, युद्धानंतर मलयकेतु आणि माझी खूप चांगली मैत्री झाली.राजा पोरस आणि माझे वडील देखील मित्र बनले. आमच्यावर पोरसचे राज्य नेहमीच न्याय्य होते.
वर्षानुवर्षे मी अनेकदा चेतकाचा विचार मनात आला कि मी आनंदी व्हायचो. मला माहित होते की तो देखील आनंदीच असेल. कदाचित कधीकधी तो माझाही विचार करत असेल.अखेर, आम्ही एकमेकांचे जीव वाचवले होते आणि हि गोष्ट सहजासहजी विसरता येण्या सारखी नाही.