अवेंजर्स सिरीजला पुढे नेणाऱ्या 2019 साली आलेल्या "स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम" या चित्रपटात पीटर पार्कर युरोपमध्ये सहलीवर जातो तेव्हा व्हेनिसमध्ये एका वॉटर मॅनचा हल्ला होतो तेव्हा चेहऱ्याऐवजी जादूचा गोळा असणारा कुणीतरी (मिस्टेरिओ) त्याच्यावर हिरवा गॅस सोडून कंट्रोल करतो. 2011 साली मी लिहिलेल्या जलजीवा कादंबरीत असलेले जलजीवा मला आठवले. या चित्रपटात त्या पाणी मानवांना इलेमेंटल्स म्हटले आहे. माझ्या जलजीवा कादंबरीत अग्नी मानव सुद्धा होते (अग्नी जीवा). माझ्या कादंबरीतील जलजीवा पण असेच आहेत फक्त त्यांची व्युत्पत्ती वेगळ्या पद्धतीने होते. असो. मूळ चित्रपटाकडे वळू.

"अवेंजर्स एन्ड गेम" या चित्रपटात थेनॉस या सुपर व्हिलनमुळे जगातील अर्धी माणसे (अवेंजर्समधल्या अर्ध्या सुपरहिरोसाहित) नष्ट होतात आणि पाच वर्षानंतर त्याच वयात पुन्हा जगात परततात. इतर लोक वयाने मोठे झालेले असतात. "शिल्ड" संस्थेचा मालक निक फ्युरी पण त्यातील एक असतो. 

आल्यावर त्याला कळतं की सगळे सुपरहिरो गायब आहेत तेव्हा तो स्पायडरमॅनला शोधतो कारण त्या नष्ट झालेल्या सुपरहिरोंमध्ये स्पायडरमॅन नसतो.

स्पायडरमॅन युरोप सहलीवर मित्रांसोबत असतांना निक फ्युरी आणि त्याची साथीदार त्याला गाठतात. मिस्टेरिओ स्पायडरमॅनला पाच इलेमेंटल्सबद्दल सांगतो. तसेच तो मल्टीव्हर्स या संकल्पनेबद्दलसुद्धा सांगतो. मल्टीव्हर्स म्हणजे पृथ्वीवरचेच पण एकापेक्षा जास्त समांतर असलेले अनेक जग. 

तर हे इलेमेंटल्स या मल्टीव्हर्समध्ये सर्वांना त्रास देऊन धुमाकूळ घालत असतात. त्यांना कंट्रोल करायला निक, मिस्टेरिओ यांना स्पायडरमॅनची मदत हवी असते पण स्पायडरमॅन सहलीच्या मूड मध्ये असतो. त्याला आवडणाऱ्या मुलीला म्हणजे एमजेला त्याला प्रपोज करायचे असते. आता अग्नीमानव हल्ला करणार असतो. त्याचा मुकाबला करायचा असतो. व्हेनिस, ऑस्ट्रिया, प्राग अशा देशांत आपल्याला हा चित्रपट घेऊन जातो. अग्नी मानव प्राग मध्ये येतो पण मिस्टेरिओ त्याला नष्ट करतो. स्पायडरमॅनपण मदत करतो. पण...

नष्ट होण्याआधी (मरण्याआधी) आयरन मॅन (टोनी स्टार्क) ने निक फ्युरी सोबत स्पायडरमॅनसाठी हाय टेक चष्मा (जो सॅटेलाईट सहित मोबाईल, कॉम्प्युटर हॅक वगैरे करू शकतो) आणि एक आणखी एक नवा "काळा हाय टेक सूट" (स्पायडरमॅनचा पोशाख) देतो. 

मागच्याच एका स्पायडरमॅन चित्रपटात (स्पायडरमॅन: होमकमिंग) टोनी स्टार्कने आधीच त्याला हायटेक बनवलेले असते. नॅनो टेक्नॉलॉजीने क्षणात शरीरभर पसरणारा पोशाख त्याला मिळतो तसेच पाठीवर यांत्रिक कोळी गरजेनुसार निर्माण होऊन स्पायडरमॅन त्याद्वारे कुठेही चिटकू शकतो. जसे आपल्या महाभारतातील सुर्यपूत्र कर्णला वेळेवर छातीवर सुपर कवच तयार होऊन शत्रूच्या बाणापासून त्याचे रक्षण करते, तसेच.

पण थांबा... 

पुढे अनेक ट्विस्ट आहेत.
मिस्टेरिओ नेमका कोण असतो? 
एमजेच्या हाती एक डिव्हाईस लागते त्यातून स्पायडरमॅनला कोणते रहस्य कळते? 
मिस्टेरिओची महत्वाकांक्षा काय असते?
मिस्टेरिओ आणि टोनी स्टार्कचे काही कनेक्शन असते का?

पुढे बर्लिन मध्ये स्पायडरमॅन आणि निक फ्युरी "भेटतात" आणि स्पायडरमॅन निकला मिस्टेरिओचे सत्य सांगायला जातो पण... 

पुढे काय होते?

पुढे सुरू होतो एक अद्भुत नेत्रदीपक भुलभुलैय्या! स्पेशल इफेक्ट्सचा भुरळ पडणारा चमत्कारिक सोहळा!

नंतरच्या बहुतेक घटना लंडन मध्ये घडतात, लंडन ब्रिजवर...!!

त्यासाठी नक्की हा चित्रपट बघा कारण त्यानंतर पुढे हाय फंडा धमाल चित्रपट "स्पायडरमॅन: नो वे होम" रिलीज होणार आहे. त्यात अनेक युनिव्हर्समधले अनेक स्पायडरमॅन एकत्र येणार आहेत म्हणजे स्पायडरमॅन 1,2,3 तसेच अमेझिंग स्पायडरमॅन 1,2 ह्या अवेंजर्स सिरीज मध्ये नसलेल्या चित्रपटातील वेगवेगळे स्पायडरमॅन आणि त्यातील व्हिलनपण एकत्र येणार आहेत. म्हणजे ग्रीन गोबलिन, ऑक्टोपस, सँड मॅन वगैरे! तेव्हा तयार राहा!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel