जळता जळता रावणाने
प्रश्न सहज केला,
सितामाईला पळवून मी
कुठला गुन्हा केला....
आजही बघतो सगळीकडे
त्रस्त दिसतात महिला,
बलात्कार अन खून करून
मिटल्या जातात अबला....
श्रीमंतांच्या दावणीला
गुलामागत बांधलेला,
खरा अपराधी
समाज आपला....
अशा अपराध्याचा आता
घोटला पाहिजे गळा,
अन रावण समजून उभं
केलं पाहिजे दहनाला....
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.