त्या दिवशी हॉस्टेलवर मी संध्याकाळी लवकर जेवण आटोपून तिच्या फोन कॉलची मेसेजची वाट पाहत होतो. आणि नेमके त्या वेळी सारखे कंपनीचे कॉल्स येत होते. मी वैतागलो मला खूप राग आला. त्यांना चांगलेच फटकारण्यासाठी मी सरळ  कॉल सेंटरला फोन केला. पण त्या बाजूने बोलणाऱ्या त्या बाईच्या मधुर आवाजाने माझे कान थंडावले. आणि मग मी अर्धा तास नको असलेल्या ऑफर्सबद्दल चौकशी करत बसलो आणि कॉल डिस्कनेक्ट केला. मी कॉल सेंटरच्या  मुलीशी बोलत असताना ती सतत मला कॉल करण्याचा प्रयत्न करून थकली होती. शेवटी, तिचा फोन लागला आणि तिने विचारले

"इतका वेळ तू कोणाशी बोलत होतास?"

आणि फक्त गंमत म्हणून मी तिला म्हणालो

"मी तुझ्या सवतीशी बोलत होतो".

ते खरे आहे असे मानून तिने माझ्याशी संबंध तोडले. त्या कॉल सेंटरच्या मुलीमुळे माझं ब्रेकअप झालं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel