भूखंडात एखादा कोपरा म्हणजे दोन बाजूमधील कोन नसेल तर असा भूखंड हा अशुभ ठरतो.

ईशान्य कोपरा : भूखंडात ईशान्य कोपरा खंडित असेल तर सुखात कमतरता निर्माण होते. यश लवकर पदरात पडत नाही. मन:शांती आणि देवांची कृपा मिळत नाही. भाग्योदय आणि धनसंचय होत नाही.

आग्नेय कोपरा :जर एखाद्या भूखंडाचा आग्नेय कोपरा खंडित  झालाअसेल तर उत्साह किंवा चैतन्य यांचा अभाव उत्पन्न होतो. कामात लक्ष लागत नाही. नैराश्य येते. गृहसौख्य, वैवाहिक सौख्य बिघडते. घरात सतत वाद होतात.

वायव्य कोपरा : जर एखाद्या भूखंडात वायव्य कोपरा नसेल तर असा भूखंड अशुभ असतो. यामुळे शत्रुपीडा निर्माण होते. हितशत्रू त्रास देतात. वादविवाद, कलह, भांडणे निर्माण होतात, मन:शांती नाश पावते.

नैऋत्य कोपरा :जर एखाद्या भूखंडाचा नैऋत्य कोपरा खंडित असेल तर त्याची अनिष्ट फळे मिळतात. आरोग्य बिघडते. व्याधी निर्माण होतात, सुखात बाधा येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel