आकांक्षा जशी पुढे गेली तसे सगळीकडे धुराचे लोट पसरले आणि एक वेगळाच विचित्र सुगंध पसरला. राजेश, रिया, सोनिया, आकांक्षा सगळे एकाएकी बेशुद्ध पडले.

काही वेळाने, जेव्हा त्यांचे डोळे उघडले, तेव्हा ते एका खोलीत होते. खोलीत येणारा स्वच्छ सूर्यप्रकाश पाहून त्यांना हायसे वाटले. ते इथे कसे आले याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्याच खोलीत एका कोपऱ्यात आसनावर बसलेले एक साधूबाबा उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या कमंडलू मधील पाणी त्यांच्यावर शिंपडले.

"आपण कोण आहात?" राजेश उभा राहिला आणि त्याने विचारले. सोनिया, आकांक्षा, रिया सुद्धा आता उठून उभ्या राहिल्या आणि साधू बाबांकडे आश्चर्याने पाहू लागल्या.

"मी एक संन्यासी आहे"

तेवढ्यात एक माणूस आत आला आणि म्हणाला.

“आदिवासींची टोळी निघाली आहे. आपल्याला इथून लवकर निघावं लागेल” तो माणूस राजेशकडे बघत म्हणाला.

"नक्की कोण आहेस तू? आणि आम्हाला मदत कशी काय केलीस?" सोनिया आश्‍चर्याने खोलीकडे पाहत म्हणाली.

“ मी या वाड्याचा केअर टेकर आहे, बरेच लोक इथे येतात आणि आपला जीव धोक्यात घालतात, इथे खूप धोका आहे.” त्यांना समजावताना ती व्यक्ती म्हणाली.

"तुमचे नाव काय?" राजेशने विचारले.

“माझे नाव सुभानराव आहे” त्या माणसाने आपली ओळख करून दिली..

साधूबाबा म्हणाले, "हे बघा, या दुष्ट शक्ती, आणि आदिवासी इथे कोणत्याही क्षणी पुन्हा हल्ला करतील त्या आधी तुम्ही लोक इथून निघून जा."

"तुम्ही आम्हांला संपूर्ण विषय काय आहे ते सांगाल का, इथे जो येतो तो परत येत नाही असं म्हटलं जातं, ते खरं आहे का? आणि बर जे मेले त्यांचे मृतदेह कुठे आहेत? आणि तुम्ही दोघे जिवंत कसे आहात?" सोनियानी विचारलं.

“येथे राहणाऱ्या लोकांची आदिवासी सरदाराने हत्या केली होती. लोकांना वाटले की ही आत्महत्या आहे. पूर्वी खजिन्याच्या शोधात लोक येथे यायचे. पण आदिवासी त्यांना ठार मारायचे किंवा कैद करून ठेवायचे. या सर्व आत्म्यांना तंत्रमंत्राने बांधून ते आदिवासी निघून गेले.

सोनिया आणि आकांक्षा दोघी मटकन खाली बसल्या. त्यांना वाटले की डॉक्टर आशिष आणि कौस्तुभ या दोघांचा एकतर खून झाला आहे किंवा त्यांना कैद केले गेले आहे.

“येथे एक स्त्री तिच्या पती आणि मुलीसह आली होती. तिच्या पतीला कैद करण्यात आले होते आणि मुलीचा खून केला गेला होता. तीच बाई अजून जिवंत आहे, तिला दुष्ट आत्म्याने पछाडले आहे, तुम्ही सर्वांनी देवाचे लॉकेट घातले आहे ज्याने तुमचे रक्षण केले आहे," सुभानराव पटकन म्हणाला

"तुम्ही आत कसे आलात?" रियाने विचारले.

“येथे अनेक गुप्त मार्ग आणि भुयारे आहेत. हा वाडा भूत्याचा आहे. आमचा आश्रम तुमच्यासारख्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्याचे काम करतो” असे साधूबाबा म्हणाले.

"या दुष्ट शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांना मुक्त करण्यासाठी काही उपाय नाही का?" दीर्घ श्वास घेत सोनिया म्हणाली.

“त्यांना मुक्त करणे फक्त आदिवासींच्या हातात आहे. ज्यांनी त्यांना बांधले आहे तेच त्यांना मुक्त करू शकतात,” साधू बाबा म्हणाले.

इतक्यात आकांक्षा म्हणाली, "आणि तो ऑर्गन कोण वाजवत होतं? माझा नवराही तीच धून वाजवत असे. पण मी त्यांना पाहू शकले नाही. ”

सुभानराव म्हणाले "खरं सांगताय? ती धून तर सर वाजवत होते, पण त्यांना तर काहीच आठवत नाही, ते सुद्धा  आदिवासींच्या तावडीतून सुटून आले होते. मात्र आदिवासींच्या अत्याचारामुळे त्यांची स्मृती गेली आहे.”

“नंतर आम्ही त्यांना आमच्या आश्रमात सामावून घेतले आणि आम्ही आता त्यांना सर म्हणून संबोधतो.” साधू बाबा सुभानरावांकडे गोंधळलेल्या अवस्थेत बघत म्हणाले.

राजेश, रिया, सोनिया आणि आकांक्षा आनंदाने एकमेकांकडे पाहू लागले.मग आकांक्षाने सुभानरावांना विचारले.

"ते कुठे आहेत? प्लीज सांगा ना...” आकांक्षा आणि सोनिया मिठी मारून रडू लागल्या.

"चला लवकर" सुभानराव म्हणाले.

मग प्रत्येकाला थांबवून काळा धागा देत साधूबाबा म्हणाले

"हे हातावर बांधा. हा तुमचे वाईट शक्तींपासून संरक्षण करेल. तुम्ही सरांना लवकरच भेटाल.”

सगळे दाराकडे जायला लागल्यावर सुभानराव म्हणाले

"इथून नको दुसर्‍या वाटेने जावे लागेल."

सगळ्यांना आश्चर्य वाटले, "दुसरा मार्ग कुठे आहे?"

मग साधूबाबांनी कपाट सरकवून हलवलं तेव्हा एका कार्पेटखाली एक गोल लोखंडी दरवाजा होता. तो उघडून त्यांना खाली उतरवले गेले आणि शेवटी सुभानरावांनी दरवाजा  बंद केला आणि  कार्पेटने  झाकून घेतला आणि कपाट त्याच्यावर सरकवून ठेवले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel