सिंह राशीच्या लोकांमध्ये धैर्य, चिकाटी आणि संयम हा विशेष गुण असतो. तसंच, इतरांना पटकन माफ करून टाकणे ही त्यांची खासियत आहे. या राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण असतो. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास घाबरून जाण्या ऐवजी हे लोक परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. हे लोक सिद्धांतवादी असतात, परंतु त्यांच्या या गुणामुळे ते कधीकधी स्वतःचे नुकसान करतात.

पॉजिटिव्ह

हे वर्ष यशाने परिपूर्ण असेल. तुम्ही जो काही विचार कराल ते तुम्ही करून दाखवाल. तसेच, परिस्थिती देखील तुम्हाला साथ देईल. वडीलधाऱ्यांचा व्यक्तींचा आशीर्वाद व मार्गदर्शन लाभेल आणि त्यामुळे तुमची प्रगती होईल. एप्रिलपूर्वी सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण वेळ अनुकूल असून त्याचे तुम्हाला फलदायी परिणाम मिळतील. घरामध्येही मंगल कार्य होण्याचे योग आहेत.

निगेटिव्ह

२०२२ या वर्षात आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावंडांसोबत किरकोळ वाद होऊ शकतात. रागाऐवजी शांत राहिल्यास आणि संयम ठेवल्या वाद लवकर संपतील. सामाजिक वर्तुळात वावरताना मान-सन्मानाची काळजी घ्या. कारण  बदनामी ओढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा महत्त्वाचा प्रवास करताना, आपण प्रथम त्याच्या सर्व पैलूंवर विचार विमर्श करणे आवश्यक आहे. कर्ज घेणे टाळा.

व्यवसाय

या वर्षी व्यावसायिक निर्णय घेताना विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यासच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. अधिक नफा मिळविण्यासाठी कामाच्या गुणवत्तेशी आजीबात तडजोड करू नका. कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नोकरदार वर्गाची छाप पडणार आहे. तुमच्या क्षमतेचे कौतुक केले जाईल.

प्रेम

या वर्षी कुटुंबात सुव्यवस्था आणि शिस्त राखण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. घर आणि व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील. मुलांच्या करिअरशी निगडीत चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या लहान पाहुण्याच्या आगमनाची बातमी येऊ शकते. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल आणि ही नातीही मर्यादेत राहतील. फक्त एकमेकांवर प्रेम आणि विश्वासाची भावना असणे आवश्यक आहे.

आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहील. आपल्याला फक्त आपल्या सवयी बदलण्याची आवश्यकता आहे. असंतुलित आहारामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या कायम सुरु राहतात. या वर्षात आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel