कुंभ राशीचे लोक कष्टाळू आणि स्वाभिमानी असतात. ते जुन्या रीतिरिवाजांचे पालन कमी करतात. मोठी जोखीम घ्यायला हे लोक मागेपुढे पाहत नाहीत. त्यांची धर्मावर श्रद्धा असते पण आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही. कधी कधी त्यांची असलीयत ओळखणेही अवघड होऊन जाते.
पॉजिटिव्ह
धार्मिक व सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल. यामुळे मानसिक आणि आत्मिक शांती लाभेल. आव्हाने जिंकण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. यात तुम्हाला यशही मिळेल. कौटुंबिक नातेसंबंधातील वाद मिटवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. या राशीच्या महिलांसाठी हे वर्ष विशेष यश घेऊन येत आहे. महिलांना त्यांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात सुसंवाद राखणे शक्य होईल.
निगेटिव्ह
या वर्षी तुम्हाला मिळालेल्या यशामुळे काही लोक तुमच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. कदाचित खर्चही वाढू शकतो. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास शिका. तुम्ही एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगा ती गोष्ट या वर्षी पुढे ढकलणे चांगले आहे. जर तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रांवर अधिक विश्वास ठेवलात तर तुमची फसवणूक होईल. म्हणून तुमच्या प्रयत्नांना आणि योजनांना प्राधान्य द्या.
व्यवसाय
२०२२ या वर्षी व्यवसायात काही चढ-उतार होतील. व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल. मात्र, चांगले उत्पन्न असल्याने कर्जाची परतफेड लवकर होण्याचीही शक्यता आहे. घाई आणि निष्काळजीपणामुळे एखादा निर्णय चुकू शकतो. शेअर्सच्या किंवा सट्टे बाजार व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी विचार करा.आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट, ईमेल इत्यादींचा वापर करून व्यवसाय वाढवण्याची हीच वेळ आहे. नोकरदार लोकांवर कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तणाव राहील. अधिकार्यांशी वादामुळे नुकसान होऊ शकते.
प्रेम
प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या जोडीदाराची आणि कुटुंबातील सदस्यांची साथ तुमचे मनोबल वाढवेल. पती-पत्नीच्या नात्यात वितुष्टाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, अन्यथा घराच्या व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. सच्चे मित्र आणि नातेवाईक ओळखले जातील. प्रेमप्रकरणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हे संबंध तुमच्या प्रगतीला बाधा आणू शकतात.
आरोग्य
जास्त मेहनत आणि धावपळ केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कामाबरोबरच आरोग्याची काळजी घ्या. एखादा जुनाट आजार डोकं वर काढू शकतो. महिलांनी आरोग्याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. सांधेदुखी आणि स्त्रीरोगामुळे महिलांना त्रास होईल.